विषय -आपुलकी *दशाक्षरी कविता*

अर्ली एन के ए अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित 
विषय -आपुलकी
 *दशाक्षरी कविता*

निरपेक्ष प्रेम करणारी
झरझर वाहे प्रेम झरा
प्रेमाने सर्वांना बांधणारी
आई असते प्रत्येक घरा.. १

आईची ओंजळ नसे रिती
सदा प्रेम भरे  गीत गाती
जपते ती जिव्हाळ्याची नाती
सर्व करा तिजवर प्रीती.. २

 ठेच लागे पायाला'आई गं'
 येई सदा सर्वांच्या तोंडाला
पहिला धडा गिरवी अ आ
आरंभे वाणीच्या साधनेला.. ३

असा जिव्हाळा असतो सदा
आईच्या निस्वार्थ प्रवृत्तीचा
येतो  अनुभव  सदाकदा
स्वार्थ त्याग आणि निवृत्तीचा.. ४

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!