कवितेचं नाव- नटली धरणी

काव्य बहर आयोजित उपक्रम
निसर्ग काव्य, ५/७/२०२५.

कवितेचं नाव- नटली धरणी

इंद्रधनुच्या रंगासम नित्य
किरण कुरवाळते ती अवनी
हिरवा गालिचा  मोती चमकती
हिरवाईने नटली खरी धरणी

पशु पक्षी उतावीळ सारा
करण्या स्वागत पावसाचे भूवरी 
येता झरझर पहिली जलधारा
जडसृष्टीच्या स्वागता धावे सरी

बीज रुजुनी धरणीवर येता
अंकुरणी रोप इवले हिरवे खुलती
ऊन वारा अंबरी आनंदे
झाडे शीर हेलकावे नभावरती

पावसाने चातकपक्षी अगदी
अत्यानंदी मयूर नाचे स्वानंदी
निसर्गराजा कृपा तुझी सारी  
धुंद होऊनी नाचू गाऊ आनंदी

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!