उपक्रम क्रमांक :- ९७२ (चित्र काव्य)**विषय :- अन्यायग्रस्त शेतकरी वर्ग* *(मधुसिंधू काव्यप्रकार)*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- ३०.०७.२०२५ (बुधवार)*
*उपक्रम क्रमांक :- ९७२ (चित्र काव्य)*
*विषय :- अन्यायग्रस्त शेतकरी वर्ग*
            *(मधुसिंधू काव्यप्रकार)*


शेतकऱ्याच्या
आयुष्याची व्यथा
कश्या सांगू कथा
बळीराजाच्या.. १

निसर्ग कोप
चिंतातूर बळी
सदा कान पिळी
उडवी झोप.. २

पोटा चिमटा
सर्वांसाठी मळा
गळफास  गळा
मधे भामटा.. ३

कष्ट अपार
चिंताग्रस्त फार
उपवास मार
घरात भार.. ४

बळीराजाच्या
मालाला ना भाव
जीवावर घाव
 शेतकऱ्याच्या.. ५

चित्रा मधुनी
काव्य साकारुया
ऋण स्वीकारूया
मना सांधूनी.. ६

शेती मालाला
सदा मिळो भाव
कृपा असो राव
या पोशिंद्याला.. ७

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!