प्रेम काव्य* *विषय- तू अन मी**दिनांक :-०४/०७/२०२५*
काव्य बहर साहित्य मंच भंडारा
आयोजित-शुक्रवारचा उपक्रम*
*प्रेम काव्य*
*विषय- तू अन मी*
*दिनांक :-०४/०७/२०२५*
ग्रीष्मात असतो पेटता वनवा
तुझ्याच मुळे उन्हात सावली
सह जीवनी असावे हे खास
ही तुझी दृढ चेतना भावली
विश्वासाच्या नात्याने जागवली
सदा साथ असे तुलाच माझी
जशी असे सूर्याची लाललाली
सुख समाधान सदा जीवनात
हर्षभरी आनंदाची लाट आली
विश्वासाच्या नात्याने जागवली
आजूबाजू गर्द वनराई शोभे
तू जणू मनात मोहिनी थाटली
जीवनी स्वैर झुलतो हिंदोळा
तरी सर्वत्र सुख शांती वाटली
विश्वासाच्या नात्याने जागवली
तुझ्या वेणीत सुगंधी तो मोगरा
हाताने माझ्या सखे माळलेला
झाले आपुले एकरूप भावबंध
विश्वासाच्या नात्याने जागवलेला
प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे 33.