आजचे कवी:-- *सुधीर मोघे यांची शब्द ओळ* विषय *फिटे अंधाराचे जाळे*अष्टाक्षरी
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित*
सोमवार दिनांक २८-७-२०२५ *चा दैनिक उपक्रम क्रमांक ९७०*
*शब्द ओळ कवींची*
*भाव शब्द मनाचे*
आजचे कवी:-- *सुधीर मोघे यांची शब्द ओळ*
विषय *फिटे अंधाराचे जाळे*
अष्टाक्षरी
देश होताच स्वतंत्र
फिटे अंधाराचे जाळे
झुगारून पर तंत्र
मिटे गुलामीचे चाळे.. १
पहाटे झुंजू मुंजूला
फिटता अंधार जाळे
गात वासुदेव आला
आजूबाजूस न्याहाळे.. २
पूर्वा रंगे लालीलाल
फुलांचे ताटवे छान
सूर्य आकाशी दिसता
उमले कळ्या लहान.. ३
लीला असे निसर्गाची
उलटे रात्रीचा काळ
फिटे अंधाराचे जाळे
उठा ही शुभ सकाळ..४
लुप्त ती चांदणी नभी
वाहे मंद मंद वारा
भा येता धरणीवर
दिसे पृथ्वीचा पसारा.. ५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे