निसर्ग रक्षण वादा* कविता कवितेचे पान

कवितेचे पान
अष्टाक्षरी

*निसर्ग रक्षण वादा*

आला श्रावण श्रावण
रिमझिम त्याचा खेळ
पडे सरीवर सरी
पेरण्या  बी असे वेळ.. १

बळीराजा सुखावला
पेरणी होताच छान
आनंदाने गंधाळला
ते काळ्याआईचे भाण.. २

सडा पडे प्राजक्ताचा
आसमंत बहरला
चिवचीवाट पक्षांचा
निसर्ग गजबजला.. ३

वृक्ष नाचे वाऱ्यावरी
बांधे पायात घुंगरू
ताल धरे पृथ्वीवरी
वीज फोटो काढे त्वरी.. ४

बरसल्या सरीवर सरी
कृष्ण जन्म,राखी बांधा
सण हर्षोल्लासे भारी
निसर्ग  रक्षणा वादा.. ५

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!