विषय _आला श्रावण* कविता
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित श्रीकाव्य लेखन कार्यशाळा शनिवारचा विशेष उपक्रम निसर्ग काव्य*
*विषय _आला श्रावण*
*शीर्षक-श्रावण व्रतवैकल्याचा*
आला श्रावण
व्रतवैकल्याचा
उपवासाने संचय करूया
पुण्य कर्माचा.. १
साडी वसुंधराची
रंगीबेरंगी
सुगंधी कळ्या फुलांची
सुंदर विविधांगी.. २
डोंगर माथ्यावर
धवल
निर्झरे झरा सुंदर
शांत निश्चल.. ३
ऊन सावली
खेळ
जणू खेळते लपाछपी
निसर्ग माऊली. . ४
स्वातंत्र्याचा उत्सव
गोजिरा
करण्यास येई सरीवर
सरी साजरा.. ५
श्रावणमासी बांधूनी
राखी
नागपंचमी करण्या माहेरी
येई सखी.. ६
फेटा बांधणी
सप्तरंगाचा
बांधतो इंद्रधनु,उल्हास
वाढवी चराचराचा.. ७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे