दीप पूजन कविता

*💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित गुरुवार दिनांक २४-७-२०२५ चे दैनिक उपक्रम क्रमांक९६६ 💐*
         *श्री काव्याची कार्यशाळा*

           *विषय:--  दीप पूजन*


झगमगत्या जगात
तिन्हीसांजेला
समाधानाने लावता दिवा
हर्षोल्हास मनाला.. १

अज्ञानाचा अंधकार
मिटवण्यास
ज्ञानचे दिवे लावूयात
विकास पावण्यास.. २

गावी सूर्य 
नाही 
त्या गावी ज्ञानकिरण
घेऊन जाई.. ३

आषाढी अमावस्या
काळरात्र 
दिवे लागणीला वाचत
बसूया शास्त्र..४

समई निरांजन 
लह्मणदिवा
लावता,भेट घडवी
जीवा शिवा.. ५

आषाढ अमावस्या
दारोदारी
करता दीप पूजन
ज्ञानप्रकाश घरोघरी.. 6

आषाढ जाता
श्रावण
येतो,व्रतवैकल्य पूजा 
समृद्धीस मनपावन .. ७

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता