आभार कविता

एर्लियन के ए पुणे
प्रतिष्ठान आयोजित उपक्रम क्रमांक ३५.
अष्टाक्षरी
२२/७/२०२५

आभार
कार्यक्रमाच्या शेवटी                         गोड  मानावे आभार
कृतज्ञ राहण्यासाठी
करावे भाव साकार.. १

कृतज्ञ राहू  गुरुचे
आणि आई-वडिलांचे
प्रतीक आहे प्रेमाचे 
आभार सदा तिघांचे..२

 धन्यवाद द्या सूर्याला
अंधाराला  तिलांजली
 देत, सूर्य प्रकाशाला
 वसुंधरा देते अंजली.. ३

आभार वसुंधरेचे
काळजी घ्यावी पृथ्वीची
 तिच्यावर वावरतो
पेरणी करा स्नेहाची.. ४

द्या धन्यवाद सैनिका
त्यांच्यामुळे राष्ट्र आहे
सुरक्षित आज उद्या
भारताची जय आहे..५

मिळे आपणास देह
मिळता पंचइंद्रिया
संवेदना ती जागवा
घाणेंद्रि चक्षुइंद्रिया .. ६

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता