काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम श्री काव्य लेखन कार्यशाळादिनांक२१/७/२०२५.

काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम श्री काव्य लेखन कार्यशाळा
दिनांक२१/७/२०२५.

 काव्य विषय : पाऊस आला

पाऊस आला
पृथ्वीवरती
वीज लख लखत
इशाऱा करती .. १

ग्रीष्म किरण
बरसे 
उन्हात चातक पक्षी
पाण्यासाठी तरसे    ..२

बहरे वेली
स्वच्छंदी
वातावरण सारे होई
हर्षुनी आनंदी.. ३

ढग  गर्जले
धरणीवरी
पाऊस सरीवर सरी
धरणे भरी.. ४

ग्रीष्मानंतर गंध
दरवळ
मातीचा सुगंध मिळता
जाई मरगळ.. ५

हिरवा शालू 
धरणीवरी
पाना फुलांची वेलबुट्टी
सुंदर भरजरी.. ६

प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता