मराठी म्हणीनुसार काव्य* *विषय-करीन ती पूर्व दिशा* *गुरुवार दि. १७/०७/२०२५*

.  *मराठी म्हणीनुसार काव्य*
    *विषय-करीन ती पूर्व दिशा*
  *गुरुवार दि. १७/०७/२०२५*

कैकयी,म्हणे मी
करीन तीच पूर्व दिशा
रामास धाडे वनवासास 
आयोध्यात पसरे ही निराशा 
१
कौशल्या,आपले 
दात आपल्याच ओठी
मंथना कैकेचे कान भरवी
भरतास गादीवर बसवण्यासाठी
२
दशरथास पडे पेच
इकडे आड तिकडे विहीर
कैकैला दिलेल्या दोन वचनाने
रामास धाडे वनी राजा सोडे धीर
३
संयमी रामाच्या 
कानी सात बाळ्या
मी मी तू तू पणा सोडून
करे पर्णकुटीत आनंद सोहळा
४
शृपखंनानं उचलून 
जीभ लावली टाळ्याला
माझेच खरे आहे म्हणताना 
जीव आला हो तिच्या गळ्याला
५
रामदास,आलिया 
भोगासी असावे सादर
माझ्या भक्तांनो अहंकार 
सोडा मिळे मायेची उबदार चादर
६
उथळ  पाण्याला 
असे खळखळाट फार
हेकड अतिशहाण्या कंसाला 
खावा लागला कृष्णाचा मरेपर्यंत मार
७
अर्थ
आपल्या कानी सात बाळ्या - येणाऱ्या संभाव्य संकटाशी धीराने सामना करणे)
प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता