विषय:घन आले बरसुन* *अनावर* ५/७/२०२५.
काव्य बहर साहित्य मंच आयोजित उपक्रमासाठी
*विषय:घन आले बरसुन* *अनावर*
५/७/२०२५.
*शीर्षक:* चैतन्य
काळ्या कृष्णवर्णी ढगांनी
गर्दी केली आकाशी जाऊन
दंगा मस्ती घालता मेघानी
घन बरसतात अनावर होऊन
खळखळून वाहतात स्वानंदी
नाद करीत नाले ओढे भरुनी
पक्ष्यानी पंख फडफडे आनंदी
घन बरसतात आनंदी होऊनी
क्षणार्धात जलमार्ग परिसर
मुले सोडतात होड्या सुंदर
ओथंबणारा झरा अवखळ
प्रफुल्लित वेली तरू तयावर
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.
चला चारोळीच्या गावा विषय वशिला
चारोळी क्रमांक- 165
काही श्रीमंतीला सलाम करतात
काही गरिबीला गुलाम करतात
काही वशिल्याला प्रणाम करतात
काही माणसे टेबलाखालून देतात
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.