शनिवारचा उपक्रम -निसर्ग काव्य विषय : धरतीचे लेणे*

*शनिवारचा उपक्रम -निसर्ग काव्य विषय : धरतीचे लेणे*

आलो जन्मास अवनी वरती
   प्रेम कहानी पाऊस वाऱ्याची
वीज घंटा कडाडे  गगना वरती
  धरणी वाट जोगे त्या इशाऱ्याची 
१
तापून निघे अवनी उन्हाळ्यात
   संकटे सुनामी भूकंप वादळत
हे झेलत उन्मेशे पावसाळ्यात
   धरणी आनंदे  मेघास भेटण्यात
 २
कधी कधी रुसून हट्टी वारा, कधी
   असे शांत  कधी घेई उंच भरारी
वारा स्पर्शे ढगांना आकाशामधी
  मेघ अवनीवर बरसे सरीवर सरी
३
   एकेंद्रीय जीवा,पंचेंद्रिय जिवास
मेघ जीव दान देईल पर्यावरणास
  हे श्रेय जाते ब्रह्मा विष्णू शिवास
सजवे सोने चांदी मोत्याने मातीस
 ४
  चराचरात रूप घेते  धरणी वधू 
हिरवा शालू नेसत ती अवतरते
  दिव्य रूप हे परमेश्वराचे अवनी
 सर्वांना अंतर्यामी ही खून पटते
५
प्रा. सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता