गुरुपौर्णिमेनिमित्त अष्टाक्षरी काव्य स्पर्धा १०/७/२०२५.विषय -- चला वन्दू गुरुराया

काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित
 गुरुपौर्णिमेनिमित्त अष्टाक्षरी काव्य स्पर्धा 
१०/७/२०२५.
विषय -- चला वन्दू गुरुराया

चला वंदू गुरुराया
गुरु जीवनाचा सार
आई माझी असे गुरु
निसर्ग महती फार ..१

         गुरुजी आहे दीपक
         गुरुजी आहे चांदणं
         गुरु विना हा अंधार
         गुरु जीवांचे गोंदण..२

गुरु ते प्राण आधार
जीवना येईल अर्थ
जीव नसे निराधार
जीवन होईल सार्थ.. ३

         सुख दे दुख मिटवा
         ज्ञानाचा वाहतो झरा
         ज्ञानाची ज्योत पेटवा
         कृपा आशीर्वाद वरा.. ४

दत्ताचे गुरु चौविस
करू गुरु  गुणगान
सदा नमन  गुरूस
विनयाचे ठेवा भाण.. ५

          प्रयत्नांती परमेश्वरा
          मार्ग सदा स्वीकारावा
          शुभारंभी  मोरेश्वरा
          अहंकार धिकारावा.. ६

गुरु सांगे  छान मार्ग
जणू फोन संवादाचा
दाखवी सदा सन्मार्ग
तत्पर हो भेटण्याचा.. ७

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता