कवितेचे नाव-संगणक युगातील आईचा शोध

अर्लीयन के ए अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित उपक्रम-१८.
दि- ४/७/२०२५.

मुक्त छंद-
कवितेचे नाव-
संगणक युगातील आईचा शोध

आई शोध शोध शोधलं तुला
कुठेच सापडत नाहीस तू मला 
ऑफिसात पाहिलं दुकानात  शोधलं
बॉसच्या मागे मागे पळणारी 
गिर्‍हाईकाची हांजी हांजी करणारी
बाईच्या स्वरूपातील आई मला दिसली
माझ्या मनातली आई  मला  भेटली नाही १

आई शोध शोध शोधलं तुला
कुठेच सापडत नाहीस तू मला
तुला सिरीयल मध्ये पाहिलं इंटरनेटवर शोधशोध शोध शोधलं 
आईच्या रूपातील बाई मला दिसली 
पण माझ्या मनातली आई मला भेटलीच नाही
 नटून थटून स्वयंपाक घरात काम करणारी बाई मला दिसली 
आई शोध शोध शोधलं मी तुला
कुठेच सापडत नाहीस तू मला.२

अग तान्हं तुझं रड रड रडतंय
 पान्हा कसा फुटत नाही
तुझं मायेच सॉफ्टवेअर जरा हार्ड झाल्य का? हार्ड झाल्य काय गं? 
अन पैसे जमवण्यातच गोड झालय का गं? 
आई शोध शोधलं तुला कुठेच सापडत नाहीस तू मला... ३

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे  33.