विषय : पावसाच्या कानी* *विषय : दि :२२/०६/२०२५*

            *आयोजित*
*ArLiEn KA  अध्यात्म पुणे प्रतिष्ठान*  
*विषय : पावसाच्या कानी*   
*विषय :  दि :२२/०६/२०२५*
 
गरगर गरगर  गरगर वारे गिरक्या घेत थांबून गेले
पावसाच्या कानी हितगुज करत काहीतरी सांगून गेले ll 
धडाडधूमs धडाडधूमs धडाडधूमs मेघ गर्जत उठले
घामाघूम झालेले ढग वारा येता सैरा वैरा पळत सुटले
गरगर   गरगरs गरगरs वारे गिरक्या घेत थांबून गेले
पावसाच्या कानी हितगुज करत काहीतरी सांगून गेले ll1ll

पत्र्यावरी तडम् तड तडम् तड पावसाचा वाजे नगारा
वर्षाराणीचा सहवास लाभतो वेचताना थंड थंड गारा
गरगर गरगर गरगर वारे गिरक्या घेत गरगरून गेले 
पावसाच्या कानी काहीतरी हितगुज सांगून गेले  ll2ll

हिरव्या वसुंधरेचा सुंदर नजारा पावसानं धाडला माहेरा
बाबा सूर्य -आई वसुंधरा नाचत वर्षराणी येते माहेर
गरगर गरगर गरगर वारे गिरक्या घेत गरगरून गेले
पावसाच्या कानी काहीतरी हितगुज सांगून  गेले  ll3ll

हिरवा शालू हिरवा चुडा वसुंधरे ची वाढवी शोभा
किलबिलणारी मुले वसुंधरेची जणू आहे किरणप्रभा
गरगर गरगर  गरगर वारे गिरक्या घेत गरगरून गेले 
पावसाच्या कानी काहीतरी हितगुज सांगून गेले  ll4ll

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड- पुणे,33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण