प्रेम काव्य -विरह२७/६/२०२५.

काव्य भर साहित्य मंच भंडारा आयोजित
काव्य भर साहित्य मंच भंडारा आयोजित
प्रेम काव्य -विरह
२७/६/२०२५.

कधी  रिमझिमणारा पाऊस तर
कधी  कडक ऊन 
प्रियसीला बोलवण्या कोकिळा गात  रहाते आर्त धून

रिमझिम रिमझिम पाऊस  बरसता  येते तुझी आठवण
अनेक तुझ्या स्मृती हृदयच्या कुपीत कुंद कुंद साठवण

आठवतो पापण्या मधील तुझा प्रेम भरावा ओलावा
धबधबणारा पाऊस वसुंधरेला मातीचा करतो गिलावा

तू मला आठवतो दाटून आलेला तर कधी कोसळलेला
कधी गोड पाण्याचा झरा तर कधी शब्दात उसळलेला

कधी धबधब्यात होऊन बेधुंद तुझ्या स्मृतीने रोमांचते अंग 
तुझे माझे अविट प्रेम जीवनी अवतरले इंद्रधनुचे सप्तरंग


प्रा 

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण