मराठी म्हणीनुसार काव्य लिहिणे**विषय :-- शेरास सव्वाशेर*
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
*गुरुवारचा उपक्रम*
*मराठी म्हणीनुसार काव्य लिहिणे*
*विषय :-- शेरास सव्वाशेर*
*दिनांक :-१९/०६/२०२५
सासरी माहेरी भेटतात उंटावरून शेळ्या हाकणारे
सतत सूचना देऊन दुसऱ्याला स्व प्रमाणे वाकवणारे १
पाहतो एकाची जळते दाढी त्यावर दुसरा पेटवतो विडी
सावध राहावे अशी माणसे आयत्या बिळात नागोबा सोडी २
कसलाही विचार न करता उचलली जीभ लावली टाळ्याला
गोड गोड बोलून फास लावणारे भेटतात गळ्याला ३
आपलेच दात आपलेच ओठ मग
आपण का व्हावे पावशेर
त्यासाठी सदा सतर्क राहून जिद्दीने व्हावे शेरास सव्वाशेर ४
जसे कराल तसे भराल अशी रीत जरी असली तरी
वाईट काम केलेच नाही मग कर नाही तर डर नसे दारी ५
काम करताना शिवबांना केसाने गळा कापणारे खूप भेटले
राजे शेरास सव्वाशेर होऊन आत्मविश्वासाने लढले ६
प्रा. सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे ३३.