प्रेमातील विरह

प्रेमातील विरह

सख्या रे डोळे करती तुला इशारा
आठवणीच्या साठवणीचा सहारा

पहिला स्पर्श तुझा मनास  होता
तो आठवता अंगावर येई शहारा

सख्या आई- बा स सोडूनी आले
तुझ्या नावे माझा केला सातबारा

तुझ्या नावाचे लावले कुंकू तरीही
तुझा माझ्या वर कडेकोट पहारा

वेणीवरती माळे जाईजुई चमेली
करते सोळा शृंगार साज हा सारा

मलमली तारुण्याची चढता लाली
सख्या स्वर्गसुखाचा तूच की नजारा

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता