कवितेचे नाव -सदा असावे

काव्यवर साहित्य मंच आयोजित उपक्रम निसर्ग काव्य हवामानातील बदल
कवितेचे नाव -सदा असावे

मंद वाहणारे धुंद वारे
वसुंधरेला जोजवणारे

सदा असावे मंद चांदणे
चंद्राला ही लाजवणारे

बहरली झाडे सुगंधी वारे
कळ्या फुलांना जागवणारे

असे असावे प्रणय गीत
रातराणीस  जोजवणारे   

कोकिळेचे मंजुळ अलगुज
सदा उषःकालास आळवणारे

प्रभात काली दहिवर पडले
सदा वृक्षवेलीस लाजवणारे

असे असावे प्रियकराचे
रूप मनोहर  आळवणारे

प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड- पुणे. 33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण