उपक्रम *निसर्ग काव्य*विषय:-- निसर्ग पहाट

शनिवार दि २८-६-२०२५ 
कवितेचे पान
     उपक्रम *निसर्ग काव्य*
विषय:-- निसर्ग पहाट

पावसाने भिजली पहाट
निसर्ग रोमांचित झाला
धुंद बेधुंद झोंबे गारवा
निसर्ग स्पर्शाने गंधाळला

तरु वेलीवरी जाई जुई
गंधित होत फुलते छान
केशर कांती फुले शेवंती
श्वास सुगंधी ठेवत भान

प्रभाती पक्षी गातो गाणी
होऊनी ते तरुंवर गोळा
सृष्टीला जाणीव त्याची
पहाटे आनंदाचा सोहळा

पावसाचे अप्रतिम कारंजे
थंडगार उडवतात तुषार
शुभ्र धवलदार बिंदू दिसे
जसा मोत्यांचा सुंदर हार

अशी मैफिल निसर्गाची
प्रफुल्लित राहून गाते मन
जेव्हा जेव्हा जावे निसर्गात    
 आनंदी होते चराचरी तनमन

प्रा.सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे ३३.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता