शब्द ओळ* विषय- निशाणा तुला दिसला ना गझल काव्यप्रकार
काव्यबहर साहित्य मंच भंडारा
दि.३०.०६.२०२५ सोमवार
*शब्दकवींचे :- कवी शांताराम नांदगावकर यांची शब्द ओळ* विषय- निशाणा तुला दिसला ना
गझल काव्यप्रकार
सुखाच्या आगे मागे सदा तू फिरताना दिसला ना
संतांच्या उपदेशाचा नाही निशाणा तुला दिसला ना
सदा हाव तुझ्या जीवाला तृप्ती कधी मिळणार नाही
मृगजळाच्या मागे सदा तू असा धावताना दिसला ना
जोड माणसांना प्रेमाने कशाला तो गाडी अन् बंगला
किती तुझ्या गरजा त्याच साठी पळताना दिसला ना
जीव रमव पुस्तकात निसर्गात सद्भाव भरे जगण्यात
आनंदी आनंद जीवनात तुझ्या फुलताना दिसला ना
सुख मनशांतीसाठी सदैव धाव धावला पैशामागे
साधुसंत सांगून गेले त्यात नसे सुख विसरताना दिसला ना
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे ते 33.