ओढ तुझ्या भेटीची*
काव्यबहार साहित्य मंच आयोजित
आजचा उपक्रम
दिनांक :-२०/०६/२०२
*ओढ तुझ्या भेटीची*
विठ्ठला वारीत दंग होऊनी टाळ मृगंध जणू नाचती
ओढ तुला भेटण्या मन माझे सदा गाते तुझी आरती
विठ्ठला तू पेरलेल्या सूर्याची किरणे वेचते पदरात
ज्ञानप्रकाश पोहोचवण्या जाते अंधाऱ्या घरात
विजलेल्या दिव्याच्या तुझ्या मुळेच फुलवते वाती
माऊली तुझ्या नामघोषाने उजाळल्या ज्ञान ज्योती
विठ्ठला रुक्माईच्या बांगड्यांचं नवबळ पाहिजे जगात
ज्ञान विज्ञानाची कास धरण्या प्रकाशमय नवयुगात
विठ्ठला वाऱ्या पावसात पाऊल कधीच थकत नाही
हजारो आली विघ्ने तरी दर्शन घ्यायचे चुकवत नाही
विठ्ठला दिवा घेऊनी तेजाळते तुझ्या तुळशी वृंदावनी
सुख समृद्धीच्या मंजिरीचा दरवळे सर्वांच्या अंगणी
विठू माऊली आस लागली रे तुझ्या दर्शनाची
दर्शन दे रे विठाई गोडी मज लागली तुझ्या कीर्तनाची
प्रा.सुरेखा कटारिया, चिंचवड- पुणे ,33.