कविता- सुंदर वेळी

*दिनांक :-१३/०६/२०२५*

कविता- सुंदर वेळी

तिन्हीसांजेच्या सुंदर वेळी
सख्या मनासम घडून आले
अचानक तू समोर येताच 
 प्रीतीने मी रे मोहरून गेले

तिन्हीसांजेच्या सुंदर वेळी
कृष्ण सुदामा ठेवत साक्षी
मित्रत्वास गुंफत असताना
बासुरी मनावर कोरते नक्षी

तिन्हीसांजेच्या सुंदर वेळी
मंजुळ पावा घुमला गगनी
तू सूर लावता सप्त सुरांनी
मी आळविते प्रीतीची गाणी

तिन्हीसांजेच्या सुंदर वेळी
मम रंगप्रीतीचे खुलूनआले
तुझ्या माझ्या प्रेमास पाहुनी
मी गाली सदा हसत राहिले

प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड -पुणे ३३.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता