काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित चित्रा आधारित काव्य लेखन उपक्रम*
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित चित्रा आधारित काव्य लेखन उपक्रम*
*शीर्षक _ आई बिन पगारी फुल अधिकारी
दररोज नव नवी देण्या परीक्षा
नाविन्याचा सदा घेऊनी ध्यास
विकासाची उंचभरारी घेण्यास
आई धरते अभ्यासाचा हट्टहास
बोल बोलती ते चिमुकले डोळे
उपनयन विविधांगी सुसंस्कार
अभ्यासाचे करती सदा सोहळे
आईबाबा सदा मुलांसाठी तत्पर
लावे चाल कवितेस सूर निरागस
कृतार्थ झाला मुलांचा दिवस
अभ्यास करून कृतज्ञतेने सारे
अज्ञानाचा सतत करूया -हास
मुलांना यशस्विता मिळावया
सरस्वतीचे स्वर आलाप जुळावे
मुलांच्या अध्ययनाचे गीत गावया
सदा आईने शिक्षण मंत्रीच व्हावे
उन्हे कलंडली क्षितिजा वरती
बाबा लक्ष देत आरामा वळती
आई घरकामत फुलाधिकारी
घरात असे प्रधानमंत्री बिनपगारी
प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड- पुणे 33.