कवितेचे नाव- मनोहर
8/6/2025
कवितेचे नाव- मनोहर
असावा मनाचा वसंत मनोहर
कल्पतरू मोहरतो भूतलावर
असता दिव्य दृष्टी चराचरावर
सदा दिसे सृष्टीचे रूप कलंदर
फुलावर उडते ते फुलपाखरू
लाजतं भिरभिरते फुलाफुलांवर
जीवन जगते मदमस्त कलंदर
अल्प आयुष्यी तरी जगते सुंदर
उष:कालची लाली असो नसो
अवखळ धबधबा झरा झरझरे
बाप गिरीच्या झुल्यामध्ये झुले
सरितेचे बाळ अवखळ निर्झरे
गवताच्या त्या पात्याभोवती
वाऱ्याचे पैंजण थिरके थरथर
पाते नाचत सांगे जीवन सुंदर
दुःखाची मग कशास घर् घर्
धुक्यात ती भिजली बावरली
तरुणाईच्या मनी चढते लाली
लोभसवाणा तो निसर्ग पाहता
सद् भाव पल्लवतो वसंत गाली
प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे. 33.