यांची शब्द ओळ -या झोपडीत माझ्या*

*काव्य बहर साहित्य मंच  संत तुकडोजी महाराज* 
*यांची शब्द ओळ -या झोपडीत माझ्या*


मुलाच्या जन्माचा होतो आनंद
किती तरी झोपडीत ही स्वानंद
गुळ वाटू केला साजरा परमानंद
आनंदे या ना झोपडीतून माझ्या

काळजाचा असे तुकडा  मुलगा
किती  किती आई बा नं जपला
झोपडीत श्रावणबाळ जन्मला
आनंदे या ना झोपडीतून माझ्या

 हर्षाने स्वच्छंदी वारा गाई गाणे
 वाजे मौजमजेचे असे हे तराने
 जगताना नसे कसले ही ग-हाणे
 आनंदे या ना झोपडीतून माझ्या

ना गाडी ना गादया न लोड तेथे 
कधी नसे वृद्धाश्रमाची भीती येथे
समाधे नांदतात चार पिढ्या तेथे
आनंदे या ना झोपडीतून माझ्या

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड, पुणे. 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता