मराठी म्हणीनुसार काव्य लिहिणे**विषय :-- शेरास सव्वाशेर*
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
*गुरुवारचा उपक्रम*
*मराठी म्हणीनुसार काव्य लिहिणे*
*विषय :-- शेरास सव्वाशेर*
*दिनांक :-१९/०६/२०२५*
उपेक्षितांचे अंतरंग असणारी माझी आई जिजाऊ क्रांतीज्योत सावित्री नव्या दृष्टीनं नव जग पाहायला लावते पुरुषप्रधान संस्कृतीत
शेरास सव्वा शेर होऊन
आम्हा जगण्याचे धडे देते
आकांक्षाचे पंख घेऊन भरारी घ्यायला तत्पर करणारी माझी आई नवनवीन स्वप्न दाखवते स्वाभिमान फुलवते जातीच्या राजकारणात
शेरास सव्वा शेर होऊन
आम्हा जगण्याचे धडे देते
माणूसपण हरवलेल्या माणसाच्या बाजारा मध्ये माणसात माणूसपण जपायला जागवायला लावणारी क्रांतवीर ताराबाई जगात
शेरास सव्वा शेर होऊन
आम्हा जगण्याचे धडे देते
अनाथांच्या जीवनाचे इंद्रधनुष्य रंगवत असताना जमिनीवर पाय रोवून आकाशाला गवसणी घालायला शिकवणारी सिंधुमाय जगात
शेरास सव्वाशेर होऊन
आम्हा जगण्याचे धडे देते
प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे ३३.