कविता-नाते घरादाराशी समाजाशी*
*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
*सामाजिक काव्य*
कविता-नाते घरादाराशी समाजाशी*
मंगळवार १७/६/२०२५.
नाते घरादाराशी समाजाशी जोपासताना मतभेद डिलीट करू
समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू...!
जगाला मुठीत ठेवणाऱ्या मोबाईलचे स्वागत करू
गोड स्मृतींच्या पाऊल खुणा
मनाच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू
संपत्तीच व्हिल न बनवता
आपण सुसंस्कारान गुडविल बनवू
समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू
चला ना पुन्हा जगणं आपलं सुखकर करू ...!
आपुलकीचं नातं अपलोड करू
जर आला दुराव्याचा व्हायरस तर स्नेहप्रेमाचा अँटि व्हायरस भरू
नकारात्मक विचारांचा फॉरमॅट मारू
समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू
जगाला मुठीत ठेवणाऱ्या मोबाईलचे स्वागत करू
चलाना पुन्हा जगणं आपलं सुखकर करू...!
जगण्याचे आनंदी क्षण सेव्ह करू
दुःख निराशा अपयश आलं तरी डिलीट करू
लोss होणारी आयुष्याची बॅटरी
आनंदी क्षणाने स्वःत सतत चार्ज करू समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू
जगाला मुठीत ठेवणाऱ्या मोबाईलचे स्वागत करू
चला ना पुन्हा एकदा जगणं आपलं सुखकर करू...!
संस्कारक्षम पिढी घडवत जाऊ कारण संपत्तीची व्हिल बनत
तर सुसंस्काराने गुड विल बनते
मुलांसाठी गाडी बंगला इमला कशाला साठवू
मी काय सहन केलं कशाला आठवू
समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू
जगाला मुठीत ठेवणाऱ्या मोबाईलचे स्वागत करू
चला ना पुन्हा एकदा जगणं आपलं सुखकर करू. ..!
फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सऍप ट्विटरवर आपण अपडेट राहू
शेजाऱ्यांचं दुःख पाहून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी धावून जावू
जगण्याचा जीबी वाढवत राहून
समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू
जगाला मुठीत ठेवणाऱ्या मोबाईलचे स्वागत करू
पुन्हा एकदा जगणं आपलं सुखकर करू ... !
जगातील अपडेट साठी विविध एप वाढवत राहू
लाईकस नाही मिळाले तरी नातेसंबंध टिकण्यासाठी सुसंवाद साधत राहू
नेट पॅक संपला तरी नात्यातला गोडवा वाढवत राहू
आपण सारे फोटो काढताना जसे हसतो तसे हसत राहू
समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर आपण स्क्रॅच करू
जगाला मुठीत ठेवणाऱ्या मोबाईलचे स्वागत करू
चला ना पुन्हा एकदा जगणं आपलं सुखकर करत जाऊ...!
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33