कविता-हा माझा मार्ग एकला*

*कविता-हा माझा मार्ग एकला*
  
*दिनांक :-१६/०६/२०२५*

हा माझा मार्ग एकला अवघड माझ्या मनात होता 
मी माझा राहिलो नाही दुसराच माझ्या  घरात होता

गुरुचा आदर्श  प्रेरणा  होती, ती माझी सदा  मनकरणी
वडीलधाऱ्यांचा अनुभव माझ्या सदा अंगवळणी होता

काट्याकुट्यात चालून देह माझा जरी थकला भागला
मी हरपून  जायचो खरा स्वानंद माझा जगण्यात  होता

नेहमी गवसणी कठीण प्रसंगास घालायचो मी
सारा परिवार मला झेलून तोलत बोलणारा होता

माझा मार्ग एकला अवघड कठीण माझ्या  मनातला
रस्ता माझा सर्वांच्या सहकार्याने दीप तेवणारा होता
  

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण