बडबड गीत- गरगर वारे

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
            *आयोजित*
         
*विषय : दिवस पावसाचे*
*शनिवार दिनांक :-१४/०६/२०२५*
 
बडबड गीत- गरगर वारे

गरगर  गरगर वारे गिरक्या घेत थांबून गेले
पावसाच्या कानी काहीतरी सांगून 
गेले ll

तोच धडाडधूम धडाड धूम मेघ गरजत सुटले
घामाघूम झालेले ढग  वारा येता सैरावैरा बरसत  सुटले
गरगर  गरगर वारे गिरक्या घेत थांबून गेले
पावसाच्या कानी काहीतरी सांगून गेले ll1ll

पत्र्यावरती तडतड पावसाचा वाजे नगारा
वर्षाराणीचा सहवास लाभला वेचताना थंड गारा
गरगर  गरगर वारे गिरक्या घेत थांबून गेले 
पावसाच्या कानी काहीतरी सांगून गेले ll2ll

हिरव्या हिरव्या वसुंधरेचा सुंदर नजारा पावसाने धाडले माहेरा
बाबा सूर्य -आई वसुंधरा बाबांचा धाक सहन करत वर्ष राणी येते माहेर
गरगर  गरगर वारे गिरक्या घेत थांबून गेले
पावसाच्या कानी काहीतरी सांगून  गेले ll3ll

हिरवा शालू हिरवा चुडा वसुंधरेची छान छान शोभा
किलबिलणारी आम्ही मुले  वसुंधरेची आहोत  प्रभा
गरगर  गरगर वारे गिरक्या घेत थांबून गेले 
पावसाच्या कानी काहीतरी सांगून गेले ll4ll

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड- पुणे,33.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!