माझे दैव मला कळे*9/6/2025. सोमवार

*माझे दैव मला कळे*
9/6/2025. सोमवार

स्वार्थाची ही नातीगोती
कसे जगावे ही शिकवी
मी काय करावे काय पहावे
का मजला सांगत आहेत
माझे मी दैव जाणत आहे 
माणुसकीने सदा चालत आहे
तरीही माझ्या भावफुलांना 
नात्यानी पारखे  केले आहे
ज्याचे केवळ भलेच केले
उलटून ते सारे आले आहे
एकटी आले एकटी जाणार 
माझी वाट  चोखंदळ आहे
कृतार्थ केले मी माझे जीवन 
ना आनंद  ना खंत ना खेद
समभावाने मनाचा घेत वेध 
जीवनाच्या सायंकाळी कृतार्थ
होऊनी कृतज्ञतेने निरोपाचे 
दणे घेणे सदा चालू ठेवत आहे
माझे मी सदा दैव जाणले आहे

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता