चिंतन-पाच जून 2025 जागतिक पर्यावरण दिन*

*चिंतन-पाच जून 2025 जागतिक पर्यावरण दिन*

*शरीर  म्हणजे भाड्याचं घर आणि खाली कर,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*आचार्य भगवंत ध्यान योगी डॉ.शिवमुनीजी महाराज साहब को श्राविका सुरेखा कटारिया की त्रिवार वंदना ,सब गुरु भगवंत को नमन वंदन*
जन्मल्यानंतर राहण्यासाठी हे काही वर्षासाठी घेतलेलं घर म्हणजे हे आपलं शरीर होय....!
*आचार्य भगवंत ध्यान योगी डॉक्टर शिवमुनीजी महाराज साहेबांचे हे वाक्य आठवलं आणि आज अवतरण दिवस विविध संकल्पाने साजरा करताना अनेक गोष्टींचे चिंतन झालं.*हे भाड्याचं घर आणि खाली कर*. 
हा नकाराचा सुर नाही तर एक चिंतन आहे.खरोखरच  आपला जन्म झाला की  पेढे, बर्फी वाटतात.पुढे पुढे आपण तरक्की करतो.खूप काही कमवतो.ह्या कमावण्याच्या नादात खूप चांगल्या गोष्टी गमवतो. होत चाललेला वृक्षवल्लीचा ऱ्हास त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या.  पर्यावरणाचा असमतोल हे आपल्या लक्षात येत नाही; परंतु जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपले गुरु आपल्याला मार्ग दाखवतात.  वाढदिवसानिमित्त आपण दिलेले आशीर्वाद शुभेच्छा...!शुभ संदेश...!!काही फोन ,काही प्रत्यक्ष भेटून काही व्हाट्सअप वर इंस्टाग्राम वर फेसबुक वर भेटलो.आणि अधिक अधिक काम करण्याची ऊर्जा आपल्या सर्वांकडून मिळाली. या जगात आपण फक्त थांबायला आलो आहोत – थोडा वेळ, थोडं जगायला, थोडं शिकायला, थोडं देऊन जावं म्हणून.
आणि म्हणूनच म्हटलं जातं माझं माझं कबाड ओझं. आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व आयुष्याच्या भाड्याच्या करारापर्यंत मर्यादित आहे. हे शरीर कायमच आपलं नाही. *तन मिट्टी है मन माया*
 मग खरंच आपल्याकडे काय राहतं? समाजाची बांधिलकी,समाजाची प्रेम,दातृत्व, कर्तुत्व ,आत्म उद्बोधन हे सगळं करून त्यातून उरते ती चैतन्यमय स्फूर्ती आणि या स्फूर्तीतून निर्माण होते ती निसर्गनिर्मित स्मृती.आपली माणुसकी, आपली प्रेमळ वागणूक, दिलेली मदत, आपले चांगले कर्म, चांगला धर्म,आपले मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं. ..! त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावायलाच हवं आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय-ऑक्साइड सोडतो त्यासाठी झाड आपल्याला ऑक्सिजन पुरवतं तर आपण झाडाला कार्बन-डाय-ऑक्साइड देतो. *टेक अँड give  ही पॉलिसी सहजतेने साधता आली पाहिजेत.आपल्या शुभेच्छा अशाच  पाठीशी...! 

  लेखन -प्रा सुरेखा कटारिया  चिंचवड, पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!