आजचे चिंतन
लेकिन आईचं केलेलं माहेरपण
जसजसं आपण पन्नाशीच्या पुढे जाऊ लागतो तेव्हा आपली आई आपल्या सोबत असेलच असे नाही. कारण आपण सासरी आणि आई ती तिच्या सासरी
माहेर पण करणारी आई आणि भाऊ थकलेल्या असतात कधी अनेक अडचणींमुळे माहेर पण दुर्मिळ होतं.
आणि मग लेक आईला माहेरपणासाठी घेऊन येते. अनेक वर्ष माहेरपणाचं वात्सल्य देणार आई हीच माहेरपण करण्याची वेळ लेकीवर येते आणि ती उत्साहाने सारं काही करते.नात्याला टिकवुन ठेवणारी गोष्ट म्हणजे नात्यात होणारा रोजचा संवाद आहे. आपण किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपण किती विनयशील आहोत हे खूप महत्त्वाचं. ..!
कोणी म्हटल आहे, मशहूर होना मगर मगरुर ना होना... कामयाबी के नशे मे कभी चूर ना होना!.. मिल जाये सारी दुनिया आपको लेकिन कभी अपनों से दूर ना होना.!! जीवन जगत असताना अनेक प्रसंग येतात कधी गोड असतात ,कधी कटू असतात परंतु या सगळ्या प्रसंगावर मात करून नात्याचा धागा अगदी जपण्यासाठी धडपडणारी सपना जैन आणि डॉक्टर श्वेता राठोड ...! या दोघींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
सपना म्हणते, कोण आपल्यापुढे आणि कोण आपल्या मागे आहे हे महत्त्वाचे नाही तर कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणाच्या सोबत आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे !! याचा विचार करत काल आम्हाला माहेरपणासाठी बोलवणारी सपना खरोखरच उत्साहाची मूर्ती, उधारदायित्व,समर्पण, प्रेम, आपलेपणाची भावना सर्वांना आपलेस करणारा तिचं वागणं सर्वांच्याच मनाला भावून गेलं. माहेरपणासाठी आलेल्या मातृ शक्तीला तपस्वी पुष्पा बाई लुनावत, प्रा सुरेखा कटारिया,सौ चंदाताई मुथा या तपस्वी मातांना नमन वंदन करत सर्वांचे स्वागत केले.विशेष म्हणजे सकाळी सकाळीच संजूभाऊ जैन यांचा आलेला तो फोन आणि त्यावर बोललेली ती वाक्य *मातृतुल्य मोठी भावजय* या शब्दांन मन भरून आलं हेच सारं कमवले आपण...!
हर्ष,आनंद ही एक अशी भावना आहे की जी आपल्याकडे काहीही नसताना आपण दुसऱ्याला देऊ शकतो.
आयुष्यात आलेली माणसं कायमची सोबत राहतील न राहतील हे माहीत नाही पण त्यांनी शिकवलेले धडे मात्र कायम लक्षात राहतात. सपना, आईच्या माहेरपणाचा हा पाडलेला पायणडा या धकाधकीच्या जीवनात नात्याची वीण घट्ट करण्यासाठी फार महत्त्वाचा वाटतो. आमच्या कंचनमालाजी बाफना,पुष्पाबाई संचेती, सुनिताताई देसरडा, चित्राताई वेदमूथा, कीर्तनकार डॉ. राठोड यांची आवर्जून असणारी उपस्थिती सर्वांच्या आनंदाला द्विगुणीत करून गेली. या मातृ शक्तीने तपस्वींचे केलेले गुणगान निश्चितच आपणा सर्वांना तपस्या करण्यासाठी प्रेरणा देणारे होते .काहींनी तर आम्ही तपस्या करू असे भाव व्यक्त करून तपस्यावाल्यांचा सन्मान वाढविला व प्रभावना केली. कीर्तनकार डॉक्टर श्वेता राठोड यांनी आपल्या प्रवचनातून परिहारातून जैन परिवाराला धन्यवाद देत सर्वांचं स्वागत केलं. त्या म्हणाल्या, जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात पण क्षणात निसटुन जातात... मग ते सुख असो की दु:ख, म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्या आधी आनंदाने जगा. हे सांगणारी कृतीतून दाखवून देणारी ही भाव वेडी सपना जैन. ..! या शब्दात सर्वांनी तिचे कौतुक केले.
आयुष्य खूप छोटं आहे म्हणून जगायचं आहे तर आताच जगून घ्या... कारण नंतर करू या मध्ये खूप अंतर आहे.
जबरदस्त प्लॅनिंग व सपनाचे भाव तिच्या बोलण्यातून जाणवत होते.तिचा आचार आणि विचार म्हणजे सावली पिंपळाच्या झाडाची असो की वडीलधाऱ्या माणसाची ती नेहमी शांतीच देते.!!
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःखच उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते. तपस्वी पुष्पा बाईंनी हे उद्गार काढले.
. नातं असं निर्माण करा की आपण देहाने दूर असलो तरी मनाने खूप जवळ असले पाहिजे. असे भावपूर्ण विचार कंचनमालाजी सुनीताजी, चित्राजी, पुष्पाजी यांनी मांडले या विचारात कालच्या आईच्या माहेरपणाची सांगता झाली. जरूर सर्व मुलींनी आईचं माहेर पण केलं पाहिजे असा संदेश या छोटे खाणी कार्यक्रमातून सपनाजी संजयजी जैन परिवाराने दिला खूप खूप धन्यवाद..!
आपलीच सखी मैत्रीण मातृशक्ती
प्रा सुरेखा प्रकाशजी कटारिया