चिंतन लेख - आनंद राठोड क्षमता आजमवण्याचे हे वय
आजचे चिंतन
क्षमता आजमवण्याचे हे वय
चिरंजीव आनंद राठोड व तसेच दहावीला असणाऱ्या भारताचे भविष्य ज्यांच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे अशा माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सुरेखा आजीचे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही गुणवत्ता यादीत आला असाल किंवा कमी गुण मिळाले असतील किंवा अनुत्तीर्ण झाला असाल खचू नका. जीवन खूप सुंदर आहे. ही एक दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या परीक्षा झाल्या आणि संपल्या असे नव्हे; त्यासाठी जीवनात येणाऱ्या अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सतर्क राहण्यासाठी कार्यरत रहा हा माझा स्वतःचा अनुभव आहे
आनंद,"कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात... कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. आनंद 15 ते 22 /23 हे वय फार महत्त्वाचं..!या वयात भविष्यातील आयुष्याचा अंदाज येऊ शकतो आणि जरा बेसावध राहिला तर सारा मनुष्यजन्मच धुळीला ही मिळू जाऊ शकतो.या वयात प्रत्येक व्यक्ती कवी असतो. लेखक असतो. प्रेमकवी असतो. शास्त्रज्ञ असतो. कलाकार असतो. क्रिकेटर असतो. याचा विचार तू करतो आहेस".
याचा मनोमन मला आनंद वाटतो, म्हणूनच गाण्यांमध्ये केलेली तुझी प्रगती आणि त्या दिशेने चाललेली तुझी वाटचाल आणि त्याचबरोबर इयत्ता दहावी मध्ये सुद्धा पडलेले तुझे मार्क तुझ्यातील असणारी गुणवत्ता माणूस म्हणून जगण्याची असणारी उर्मी लक्षात येते.
मुलांनो ,मला असं वाटतं अपयश अधिक शिकवतो माणसाला पण शिकता आलं पाहिजे त्यापासून...! आजच्या जगात बाह्यरुपाला फार महत्व प्राप्त होत आहे....... त्यातूनच अनेकांची फसगत होत आहे..... बाह्यरूपापेक्षा अंतरंग कसं आहे हे जास्त महत्वाचे......!
ह भ प किसन महाराज म्हणतात,"जन्म एका टिंबा सारखा असतो, आयुष्य एका ओळी सारखं असतं, प्रेम त्रिकोणासारखं असतं; पण मैत्री मात्र कायम वर्तुळासारखी असते कारण तिला शेवट कधीच नसतो." असंच मैत्रीचं नातं आजी नातवांपेक्षा जतन करायला हवं."
आनंद माझा अनुभव तुझ्याशी शेअर करते चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा... योग्य दिशेला हळूहळू जाणे हे कधीही चांगले असते. ते तू करत आहे.
सुख म्हणजे कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे...!!
इतिहास सांगतो की काल सुख होतं... विज्ञान सांगतो उद्या सुख होईल.. पण माणुसकी सांगते आपला पुरुषार्थ बजावतो की... मन खरं असेल कष्ट प्रामाणिक असतील तर दररोजच सुख शांती आहे.!!
. घड्याळाची टिकटिक टाईम मॅनेजमेंट शिकवते आणि आई-वडिलांची तुम्हाला आत्ताच्या पिढीला वाटणारी किटकिट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवत असते!! लक्षात ठेव आई-वडील हे खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचे सोपान आहेत त्यांचं बोट धरून आनंद तू जस जसा वर जाशील तस तसा आनंदापेक्षा समाधानाने अधिक संतुष्ट होत राहील.
. व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख करून इतरांना प्रभावित करणे नव्हे तर आपल्या निर्मळ चरित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे हेच खरे व्यक्तिमत्व होय. आनंद शरीराची होणारी वाढ मोजता येते डोळ्यांना जाणवते पण मनाचा विकास आपल्या भाषेतून आपल्या बोलण्यातून जाणवत असतो शरीर कमवण्यासाठी जसा तू प्रयत्न करतोस तसेच भाषा ही कमवावी लागते शब्दसंपत्ती ज्ञान भंडाराचे दालन खुले करत असते नवे जग अनुभवण्यासाठी शब्दसंपदा खूप महत्त्वाची पुढील तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कर्तुत्वाला जळाली येण्यासाठी भाषेवर शब्दांवर प्रेम कर
तुझीच आजी सुरेखा कटारिया प्रकाश कटारिया
.