आजचे चिंतन* *नातेसंबंध*26/5/2025.

*आजचे चिंतन* 
 *नातेसंबंध*
26/5/2025.
एक सारखी पावसाची रिप  रिप सुरू आहे. 
मे महिन्यात अचानक पडणारा पाऊस कायम हेच सांगत असतो.. *गर्मी असो या गुर्मी जास्त काळ कोणाचीही  टिकत नसते.*
एक फकीर ने कहा था... *चिंता मत कर वह भी रोएगा जो आज तुझे रुला रहा है.!!*
*आपलेपणा,आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेट वस्तू नाही.!!*
*विसरून जाणाऱ्या व्यक्तीला आठवण करून द्यायची नसते. आपणही विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन  जगणं खूप महत्त्वाचं असतं..!!*
*समजूतदारपणा आणि शांतता हे वया बरोबरच आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात.,!!*
*योग्य विचार, योग्य पायवाट  माणसाच्या जीवनाच्या उत्कर्षात महत्वपूर्ण असते.आपण कोणापासून कितीही दूर राहिलो;पण आपल्या चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी आपली आठवण होतच असते..*
 *म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं मोठ धन आहे...!!*
*कांही लोकांना आपण इज्जत देण्याचा प्रयत्न करतो.. पण ते त्यांच्या वागण्यातून दाखवून देतात की इज्जत झेपण्या इतपत त्यांची ऐपत नसते.!!*
. आयुष्यात तीन प्रकारचे लोक असतात...
एक... Positive 
दुसरे.. Negative आणि तिसरे... Relative... आणि हे तिसरे वरच्या दोघांचा खेळ खल्लास करून टाकतात.  
साऱ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹
*प्रा सुरेखा प्रकाशजी कटारिया, चिंचवड.*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!