गझल

*गझलवेल सराव वर्ग 3*

■■5⃣■■

दिनांक : 14/07/23

*गझल सराव वर्ग -3⃣* 
*गझलवेल कार्यशाळा*

वृत्त क्र -५ (दिनांक १५ जुलै - २३ जुलै )

*मात्रावृत्त : अनलज्वाला*
                  ( ८ ८ ८  = २४ मात्रा)

रदिफ: तुझी आठवण

कवाफी: 

१)उरते
२)करते
३)पाझरते
४)भरते 
५)विचारते
६)शिकवते
७)शिरते 
८)सावरते
९)ओघळते
१०) बोलते
११)झरते
१२)राहते

*येता जाता छळत राहते तुझी आठवण* 
*डोळ्यामधुनी झरझर झरते तुझी आठवण* 

 *तू नसतांना ह्या एकांती मी घाबरते* 
 *तरीही मला सोबत करते तुझी आठवण* 

 *जरी टाळले तिला किती ती सोडत नाही* 
 *हळूच येते कुशीत शिरते तुझी आठवण* 

 *हळूच येते मला चिडवुनी पळून जाते* 
 *डोळे पुसुनी हसू खुलवते तुझी आठवण*

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता