श्रीराम जन्म महोत्सव निमित्त चर्चासत्राचे आयोजन**विषय महिलांचे बदलते भावविश्व

माननीय संपादक 
नमस्कार प्रसिद्धी द्यावी. 

*स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स*

*प्रभू श्रीराम जन्म महोत्सव निमित्त चर्चासत्राचे आयोजन*
*विषय -महिलांचे बदलते भावविश्व..!* 
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.अशोककुमार पगारिया होते. सहभागी- प्रा सुरेखा कटारिया, सौ सुशीला मुथा,खिवराज मुथा श्रीमती शोभा बंब,  भवरीलाल कांकरिया, सौ अंजली शहा, श्री नितीन बेदमुथा , सीमा गांधी व स्वानंद सख्या या चर्चासत्राचे सूत्रधारक कीर्तनकार डॉ.श्वेता राठोड
 या चर्चासत्रात स्त्री परवाची,स्त्री कालची,आजची आणि उद्याची या अनुषंगाने जनरेशनच्या विचारसरणीचा उल्लेख झाला, स्वतंत्र विचारसरणीची सीता  होती परवाची..!स्वतंत्र विचारसरणीची सावित्री कालची आणि स्वतंत्र विचार करून स्वतःला सक्षम बनवणारी आजची कल्पना चावला सुनीता विल्यम उद्या निर्माण होणाऱ्या अनेक आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून आचारा विचारणा सुदृढ होणाऱ्या महिला यांचा ऊहा  अपोह घेण्यात आला.
स्त्रियांच्या वेशभूषेपासून केशभूषा पासून बदलत जाणारे भाविश्व त्यातील स्थित्यंतरे यांचा विचार व्यक्त करताना अनेक सकारात्मक व नकारात्मक सूर बाहेर आले. आपल्या भारतीय संस्कृतीला कलाटने देऊन झपाट्याने पाश्चिमात्य वाऱ्याचे सूर आपल्या संस्कृतीला बेसूर करतात की काय असा पडसाद  चर्चासत्रत उमटला. 

               हे चर्चासत्र सौ मीना पोखरणा, सौ बाला बाफना, सौ अनिता नहार, सौ नितल फुलपगर यांनी नियोजन केले
आणि आपण काळाप्रमाणे कसे बदलले पाहिजे आणि आपल्या परिवाराला, सुना, मुलांना, नातवंडांना सुसंस्कृत करून त्यांचे जीवन कसे समृद्ध होईल आणि जेष्ठांना पण आनंद मिळेल याचा विचार करून आपण  वागले पाहिजेत.
प्रा सुरेखा कटारिया- सन्मान आपल्या पाठीमागे चालत आले पाहिजे तेवढं कर्तुत्व करा आपल्या चेहऱ्याला कर्तुत्वाची ओळख द्यायला हवी. मोबाईल हातात घेऊन हरघडी हरक्षणाला फोटो काढणाऱ्या या बदलत्या भावविश्वा बद्दल  विचार व्यक्त करत असताना फोटो आपल्या कर्तुत्वाचे काढायला हवे. त्यासाठी झोकुन   काम करायला हवे. अगदी वयाच्या सतराव्या वर्षापासून वयाच्या तिसाव्या वर्षी पर्यंत कुठलीही सकारात्मक स्वप्ने साकार करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी  होय.  या वयातच स्वप्न साकार करणारा कल्पवृक्ष दडला आहे. त्यासाठी बदलत्या भाविश्वाला सामोरे जाताना आजूबाजूच्या लोकांच्या भाव विश्वाचा विचार केला पाहिजे.  असे अनेक विचारांच्या सकारात्मक नकारात्मक धारा जनमानसातून या चर्चासत्रात उमटल्या. यावेळी सुखकी गुरुकिल्ली  या जयेश मोहनलाल शेठ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तके सभागृहात सर्वांना देण्यात आली चर्चासत्राची सुरुवात जास्मिन पोखरणा यांनी सुंदर भजनाने  केली. चर्चासत्राचे प्रास्ताविक स्वानंदच्या अध्यक्षा श्रीमती शोभा बंब यांनी केले ;तर आभार सौ सपना जैन यांनी मानले. 
  आपल्या समस्यांच्या उकलीसाठी अशा प्रकारची  चर्चासत्रे वारंवार व्हायला हवी असा असे भाव प्रत्येकाने व्यक्त केले.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!