स्वानंद ची माहिती
मंडळ सदस्य माहिती फॉर्म
1. मंडळाचे नाव- स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड
2. मंडळाचे ठिकाण- ब्रह्मचैतन्य हॉल बिजलीनगर
3.मंडळातील सदस्य संख्या-200 पेक्षा जास्त
4. मंडळाच्या संस्थापक अध्यक्षांचे नाव- प्रा सुरेखा प्रकाशजी कटारिया
5. मंडळातील सदस्यांची नावे आणि फोन नंबर- याची यादी वेगळी पाठवते.
6. मंडळ करत असलेले काम- अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन.आत्तापर्यंत 14 अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलने यशस्वीपणे घेण्यात आले.
* वितरागवाणी काव्य संमेलन
*अभिनव वाचन
* परिसंवाद
* प्रकट मुलाखत
* कथालेखन,काव्यलेखन
कार्यशाळा
*आगम पाठांतर
* रक्तदान शिबिर
* स्वानंद अंक
* भौगोलिक सहली
* ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना
भेट
*जैन व जैनेत्तर महिलांसाठी असणारी विविध कोर्स*
* प्रभावी भाषण कला साधना व
अविष्कार कार्यशाळा
* फॅशन डिझाइनिंग वर्कशॉप
* संगणक साक्षर बनविण्यासाठी प्रमिला कॉम्प्युटरचे विविध कोर्स
* महिलांनी लिहिलेल्या पुस्तकाचे
संपादन व प्रकाशन ,आत्तापर्यंत
दहा पुस्तकाचेसंपादन,प्रकाशन
केले.
* विविध विषयावर चर्चासत्रे
* नाटक, नाट्यछटा यांच्या
कार्यशाळा व त्याचे
सादरीकरण
* संवाद कौशल्य
* आज पर्यंत हजारोच्या वरती कथाकथने
* महिलांच्या समस्या व त्याचे
समाधान
* समाजात उत्तम काम करणाऱ्या संस्थांना व महिलांना स्वानंद भरारी पुरस्काराने पुरस्कृत करून त्यांच्या कामाचे कौतुक करणे
* भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त माता त्रिशला पुरस्काराने महिलांना सन्मानाने सन्मानित करून पुरस्कृत केले जाते.
* यावेळी गरजू संस्थांना अन्नदान केले जाते.
* साधुसंतांच्या जीवनावर डॉक्युमेंट्री फिल्म बनविण्याचे काम केले जाते.
*आत्तापर्यंत बनविलेल्या डॉक्युमेंटरी फिल्म 1) आचार्य आनंद ऋषीजींच्या जीवनावर2) पिता भीष्म सुमती प्रकाशजी महाराज साहेब3) वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराज साहेब 4) परमपूज्य प्रमोद सुधारजी महाराज साहेब5) परमपूज्य डॉक्टर मंजूसी जी महाराज साहेब6) मीरा परमपूज्य अर्चना श्री जी महाराज साहेब* यांच्या जीवनावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवून यूट्यूब चैनल ला प्रकाशित केल्या आहे.
समाजात काम करणाऱ्या समाजाचं दायित्व जपणाऱ्या अशा अनेक व्यक्तीचे व्यक्ती चरित्रे डॉक्युमेंट्री फिल्म मधून दाखवायचा प्रयत्न केला आहे.
* एकूणच बुरसटलेल्या विचारांना फाटा देऊन सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात. गेली तीस वर्षे झाले. स्वानंद महिला संस्था समाजामध्ये सक्रियतेने, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महिलांच्या विचाराला धुमारे येण्यासाठी प्रयत्नशील आहे.
हे सामाजिक दायित्व निभवताना मनस्वी आम्हा सर्वांना खूप आनंद होतो. एकूणच *वाचाल तर वाचाल* हे विचारात घेऊन वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महिन्यातून एकदा वाचलेल्या पुस्तकाचे चर्चा सत्र आयोजित केले जाते.