महिला दिन विशेष स्त्रियांचे बदलते भविष्य
महिला दिन विशेष
स्त्रियांचे बदलते भाव - विश्व
डॉ वैष्णवी पाटांगणकर ( जोशी )
खरंतर स्त्री - पुरुष समानतेच्या गोष्टी करताना, खरंच स्त्री आणि पुरुषाचे आयुष्य खरंच सारखे असते का ???
एकाच ध्येयपूर्तीचा प्रवास हा दोघांसाठी वेगवेगळा असतो. जेव्हा एखादे स्त्री पंखात बळ भरून उंच उडण्याचं स्वप्नं बघत असते तेव्हा, घरट्यातल्या पिलात तिचे पाश अडकलेले असतातच...
काळानुसार स्त्री मुक्ती ही भाषणात आली, महिला दिनाच्या कार्यक्रमात आली पण अव्याहतपणे आपल्याला जोडलेल्या जवाबदाऱ्यातून कधी मुक्त होऊच शकली नाही...
दिवसा च्या पहिल्या प्रहरापासून तिच्या सुरु होणारी धावपळ,...
स्त्री 'हाऊस वाइफ ' असो की उच्च शिक्षित, पण तिने आधी एक स्त्री होणे, महत्वाचं...
मग मुलांची आई म्हणून, नवऱ्याची बायको म्हणून, कोणाची सून म्हणून, किंवा कुणाची बहीण - मुलगी म्हणून सर्व नात्याचे आरोप स्वीकारण महत्वाचं...
एखादी स्त्री ही, रंगमंचावरील नाटकातल्या भूमिका बदलतात तसे बदलत असते स्वतः चे रूप प्रत्येक भूमिकेत....
हे निभावून स्वतः च्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवणे तिच्यासाठी किती अवघड असेल...?
जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी कुठे जाण्याची वेळ येते तेव्हा, दुसऱ्या दिवशी बाळाची परीक्षा स्पोर्ट्स डे आहे का?? त्याच्या शाळेचा डब्बा कोण बनवेल??.. इतरांच्या जेवणाची काय व्यवस्था?? घरात कोणी आजारी आहे का?? असे प्रश्न फक्त बाईलाच असतात...
त्यात काम करताना जेव्हा रात्री घरी जाण्यासाठी उशीर व्हायला लागतो,
तेव्हा कितीतरी वेळा एवढेसा चेहरा करून, आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं आपलं बाळ दिसतं....
काळ मात्र थांबला तो सम्पला म्हणत धावायला सांगत असतो,... त्या साठी धावायला निघण्यापूर्वी ही, हिचे मन मात्र, ओटा धुवायचा राहिले, भांडी पुसायची राहिली, अशा गोष्टीत अडकलेले असते...
घर आणि कार्यक्षेत्र याचा मेळ बसवताना मात्र कधी कधी आपलेच सूर हरवून बसल्या सारखं होतं... सगळ्या शर्यतीत पळताना , सगळ्या भूमिकेतून जाताना आणि एक भूमिका दुसऱ्यात न मिसळता निभावण्यात ती स्वतः चं स्वत्व च हरवून बसते.....
तेव्हा मात्र गरज असते तिला, स्वतः साठी मोकळा श्वास घेण्याची, आणि स्वतः ला थोडासा वेळ देण्याची,. आपला ' मी टाइम्' मिळण्याची...
आणि मग उमलू पाहते तिच्यातली सर्जनशीलता
त्यातून मुक्त व्यक्त होते ती ही , करते जेव्हा स्वतः वरच भरभरून प्रेम आणि पुन्हा एकदा भरते पंखात बळ जग जिंकण्याचं,
पुन्हा एकदा आपल्या समर्थ्याने जग जिंकू पाहते आणि यशस्वी होते देखील
क्रमश :