कविता -मोरया गोसावीचा इतिहास, वैभव काव्यसंग्रहासाठी

पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रह साठी कविता ...!
          कवितेचे नाव- मोरया गोसावीचा इतिहास नाही पावणार -हास
                     कवयित्री नाव -प्रा सुरेखा प्रकाश कटारिया.
पत्ता - श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट बिजलीनगर 
चिंचवड पुणे ते 33 सर्वे नंबर 60/1/अ
संपर्क नंबर-9822745030 
मोरया गोसावीच्या यात्रेचा जल्लोष घुमतोय चिंचवड गावात
भक्ती बरोबर शक्ती दिली आणि काय मागू तुझ्या दरबारात ll1ll
मोरया मंदिरात जाऊनी भाळी रेखिले अक्षत कुंकू चंदन 
मोरयाच्या कृपादृष्टीला जग सारे करते सदा नमन वंदन ll2ll
मोरया भोवती बागबगीचा फुलली फुले सजला मखर
अध्यात्माच्या ओव्या गाउनी भक्त चामरी ढाळतो किंकर ll3ll
चौसष्टकला उद्योग साहित्यनगरी  विकासाची सर्वत्र ख्याती. 
जणांचे अश्रू पुसूणी पिंपरी चिंचवड स्मार्टसिटीमध्ये अवतरती ll4ll 
जागरूक मोरया गोसावीनं जणू हातात घेतली विकास गाथा
शाश्वत सत्य जाणुनी जनमाणस श्रद्धेन चरणी टेकवि माथा ll5ll
पवनाकाठी मोरया जिम मानव्याचा तोल सावरण्या सरसावली
सोंड फिरवुणी आशिष देत प्रत्येकाच्या जीवनी हर्षाराणी भारावली ll6ll
लाखेंच्या कल्पनेन मोरया गोसावीची शब्दबद्ध पूजा  होत आहे
साहित्य परिषदेमध्ये शब्द प्रभुंचा जल्लोष जोरदार वाहत आहे.ll7lll
मोरयागोसावीचा समृद्ध इतिहास कधीच पावणार नाही हो -हास . 
भूतकाळाला साक्षी देतात चंद्रतारे  मोरयाच्या भक्तीत डुंबूया खासll 8ll

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता