कविता पिंपरी चिंचवडचा इतिहास
पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रह
दिनांक-22/3/2025
कवितेचे नाव -पिंपरी चिंचवड इतिहास नाही पावणार -हास
कवयित्री नाव -प्रा सुरेखा प्रकाश कटारिया.
पत्ता - श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट बिजलीनगर
चिंचवड पुणे ते 33 सर्वे नंबर 60/1/अ
संपर्क नंबर-9822745030
मोरया गोसावीचा जल्लोष घुमतोय चिंचवडगावात
भक्ती बरोबर शक्ती दिली आणि काय मागू तुझ्या दरबारात
वैष्णोदेवीस जाऊनी भाळी रेखिले अक्षत कुंकू चंदन
भोसरी मधील शिवसृष्टीला सारे जग करते नमन वंदन
बर्ड व्हॅली बागबगीचे फुलली फुले सुगंधी सजला मखर
विज्ञानाच्या गाथा गाता गाता चामरी ढाळतो किंकर
कला उद्योग साहित्य नगरी हिंदुस्थानात तुझी ख्याती.
दुःखी जणांचे अश्रू पुसूणी स्मार्ट सिटीचे गाणे गाती
जागरूक पिंपरी चिंचवड अंधश्रद्धेनं हातात घेतला मोठा सोटा
विज्ञानकेंद्राने सत्य दाखवून पिंपरीचिंचवडचा बदलला मुखवटा
दुर्गा टेकडी प्रत्येकाची जणू लेक लाडकी हिरवी नववधू बहरली
व्यायाम भ्रमंतीन मानव्याचा तोल सावरण्या सरसावली
लाखेंच्या कल्पनेन उद्योग नगरीत शब्द पूजा शब्द ईश्वर होत आहे
साहित्य परिषदेमध्ये शब्द प्रभुंचा जल्लोष जोरदार वाहतो आहे.
पिंपरी चिंचवडचा समृद्ध इतिहास कधीच पावणार नाही -हास .
जोपर्यंत आकाशात चंद्रतारे साक्षीला असतील पिंपरी चिंचवडच्या इतिहासाला सारे