मला भावलेला काव्यमंच- लेख
मला भावलेला काव्यमंच
लेखिका- प्रा सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड पुणे 33.
संपर्क नं. 9822745030.
साहित्य माणसाला विचार करायला लावते. अंतर्मुख करतं. चिंतनातून मंथनातून निघालेल यथार्थ ज्ञान जगण्याची नवी उर्मी देतं. समाज व्यवस्थेला बदलण्याचं प्रचंड सामर्थ्य कवी मध्ये आहे.कमी शब्दात, कमी वेळात आपला आशय मांडण्याचं काम कवी करत असतो. सद्विवेक बुद्धी आणि योग्य कृती यांची सुव्यवस्थेत सांगड घालण्याचं काम नक्षत्राचं देणं काव्य मंचान केला आहे.जग बदलू शकतो या जगाला बदलण्यासाठी कृतिशील राहणं महत्त्वाचं हे विचारात घेऊन पिंपरी चिंचवडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रांगणात सरस्वती मातेची आराधना करणारी संस्था गेली 25 वर्षापासून अविरत निस्वार्थपणे कार्य करत आहे. ती संस्था दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या कार्यान कष्टाने नावा रुपाला आलेली प्रसिद्धीस पावलेली संस्था म्हणजे नक्षत्राचं देणं काव्य मंच होय. ही काव्याची पंढरी व त्या पंढरीच्या वाऱ्या सतत करून सुदृढ, सक्षम, प्रबुद्ध साहित्यिक निर्माण करण्यासाठी निस्वार्थ वृत्तीने सतत कार्य करणारे संस्थेचे अध्यक्ष कवी वादळकार राजेंद्र सोनवणे होय.
या नक्षत्राचं देणं काव्य मंचाच्या सर्व काव्य नक्षत्रांना खूप खूप धन्यवाद व अभिनंदन करते. प्रतिवर्षी उत्साहात, चैतन्यमय वातावरणत ही काव्य पंढरी माय मराठीच्या नऊ रसामध्ये नाहून निघते. गेली चाळीस वर्ष मी पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्य करत आहे. नक्षत्राचं देणं काव्य मंच मी जवळून अभ्यासला आहे. पाहिला आहे आणि त्यांच्या साहित्य दिंडीमध्ये सहभागी होऊन साहित्याची पताका खांद्यावर मिरवताना त्याच्यातील अनेक चढ-उतार आणि राजकारणही अनुभवल आहे.
प्रतिभा ही कुणा विशिष्ट समाजाची मक्तेदारी कधीच नसते.साहित्यिकाला दैवी देणगी लाभत असली तरी तिला पैलू पाडण्याचे काम ज्याला त्यालाच कराव लागतं .त्यासाठी साधना हवी. प्रयत्न हवेत .वाचन हवं .लेखन हवं मगच या साधनेने व्यक्ती कवी म्हणून प्रसिद्धीस पावतो .हे विचारात घेऊन नक्षत्राचं देणं या काव्यमंचानं अनेक काव्य लेखनाच्या कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्यातून अनेक कवी घडवण्याचं काम या संस्थेने केलं. कवी कविता लिहू लागले; परंतु या कवितांचं सादरीकरण खूप महत्त्वाचं...!ते सादरीकरण उत्तम व्हावं यासाठी या काव्यमंचच्या अध्यक्षांनी अर्थात राजेंद्र सोनवणे व त्यांना साथ देणारी त्यांचे अर्धांगिनी प्रीती सोनवणे यांनी काव्य सादरीकरणाच्या काव्य लेखन, कला साधना व अविष्कार अशा प्रकारच्या विविध कार्यशाळेतून पूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवींना लिहित केलं, बोलतं केलं, अनेक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आणि त्यांच्या लिहित्या हाताना अधिक बळ देण्याचं काम केलं आहे. त्यांच्या प्रतिभेचे भरण पोषण करण्याचं काम या मंचानं केला आहे.
या काव्य मंचाच्या अध्यक्षस्थानी अनेक दिग्गज साहित्यिकांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. त्यातील काही दिग्गज मंगेश पाडगावकर,इंद्रजित भालेराव , डॉ नरेंद्र जाधव , प्रविण दवणे, मधु मंगेश कर्णिक , डॉ विठ्ठल वाघ , अशोक नायगावकर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ही दिग्गजांनी या व्यासपीठावर प्रेम करून आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यातील काही विशेष दिग्गज रामदास आठवले ,दीपक केसरकर , मालोजीराजे भोसले,
कृष्णकुमार गोयल ,भीमराव पांचाळे इत्यादी अशी कितीतरी नावे घेता येतील की त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
अनेक आमदार, खासदार अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे.
या दिग्गजांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच माझ्यातील असणाऱ्या प्रतिभेला धुमारे फुटले आणि मी काव्य लेखन करू लागले. काव्य लेखन करता करता सुंदर सादरीकरण करू लागले. त्यानंतर नक्षत्राचं देणं काव्यमंचानं मी लिहिलेल्या कवितांचं पुस्तक काढण्याचं ठरविलं. व गुलु गुलु बोलू ही साहित्यकृती निर्माण झाली. अल्पकाळामध्येच द्वितीय आवृत्ती ही प्रकाशित झाली. हे सार श्रेय नक्षत्राचं देणं या काव्य मंचास जातं. माझ्या लौकिक अनुभवाच्या विश्वाला अलौकिकताकडे नेण्याचे सामर्थ्य म्हणजे माझ्यातील असणारी प्रतिभा या प्रतिभेला धुमारे फुटले. माझ्या काव्य लेखनाचा,माझ्यातील कवी मनाचा विचार करून 29 सप्टेंबर 2013 ला समाजसेवक सावळीराम रमाजी डबडे कविरत्न पुरस्कार जाहीर झाला. तो दिवस माझ्या काव्य लेखनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा ठरला.
मी लिहीतच राहिले. हे फक्त माझं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं; परंतु असे कित्येक कवी निर्माण करून त्यांच्यातील असणाऱ्या काव्य ऊर्जेला उर्जित स्वरूप आणण्याचं काम या मंचान केला आहे.
सुशिक्षित, सुसंस्कृत माणूस घडविण्यासाठी समृद्ध साहित्य लेखनाची विन अधिक घट्ट करणं महत्त्वाचं. नवे साहित्यिक घडविण्यासाठी परिश्रम घेणारी ही संस्था ,त्यापासून खरा साहित्य आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही . संस्थेच्या अध्यक्षांची गुणग्राही दृष्टी असल्याने नव साहित्यिकांची दशा बदलून दिशा देण्याचं काम व त्यांच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा उंचावून पूर्ण करण्याचं काम आत्मीयतेने करत आहे. निर्मितीला अनुभूतीची जोड मिळाल्याशिवाय साहित्यिकाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. जसं जन्माला येणं ही निर्मिती परंतु त्या जन्मलेल्या जीवाला संस्कारित करणं ही अनुभूती तद्वत संस्कारक्षम साहित्य मानवी जीवनाला परिवर्तनाची दिशा देतं. साधना ही फार महत्त्वाची ....!ही साधना नक्षत्राचं देणं काव्यमंच करत आहे.
या काव्य मंचाचं ब्रीदवाक्य आहे कवी हा जगताचा धनी
खूप मोठा मानवतेचा आशय या ब्रीद वाक्यातून स्पष्ट होतो.
या काव्य मंचामध्ये ज्येष्ठ कवी मंडळी अगदी सतरंज्या अंथरण्यापासून व्यासपीठ गाजविण्यापर्यंत कार्य करताना आढळतात.या मंचाच्या माध्यमातून साहित्याचा प्रचार नवोदित कवींना मार्गदर्शन, प्रशिक्षण देणं, व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार वितरण करणं. इत्यादी कामे करत आहे.
या संस्थेकडून दिला जाणारा एक मानाचा पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार एका श्रेष्ठ साहित्यिकाच्या साहित्य सेवेबद्दल आदर व्यक्त करणारा मानाचा पुरस्कार.या पुरस्कारासाठी माझी साहित्यातील भरारी विचारात घेऊन याच मंचाने कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कारासाठी माझी निवड केली .हे सारं श्रेय या नक्षत्राचं देणं काव्यमंचास व माझ्यातील काव्य उर्मीस, पुरुषार्थास जातं.
ही काव्य पंढरीची देवाण-घेवाण अशीच वृद्धगीत होत राहो.
ज्या समाजामध्ये आपण राहतो. ज्या समाजानं आपल्यावर भरभरून प्रेम केलं त्या समाजाचं उतराई होऊन राष्ट्र उभारणीसाठी आपण कार्य करत आहोत. पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत हा भव्यसमारंभ संपन्न झाला राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफिलीमध्ये अनेकांनी काव्यवाचन करून काव्य विश्वात काव्याची उधळण केली. हे सार श्रेय जात ते वादळकार राजेंद्रजी सोनवणे- प्रीती सोनवणे यांना.
राजेंद्र सोनवणे आपल्या विचारातील आम्ही पाहिलेले काही पैलू
श्रीमंती फक्त राहणीमानाचा दर्जा सुधारू शकते.! बुद्धी, नियत आणि नशीब नाही.!
प्रेम, सन्मान, परोपकार, दिलेला अमूल्य वेळ आणि अपमान ही एक गुंतवणूक आहे. जितके आपण दुसऱ्याला देणार ते नक्कीच आपल्याला व्याजा सहित परत मिळणार. यावर आपला ठाम विश्वास. ..!एखाद्याचे सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते दूर करण्याचा प्रयत्न या काव्य मंचाने केलेला आहे.
आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, म्हणून ते मांडायचेच नाही हे चुकीचे. कारणं काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतील .
दुसऱ्याच्या चुकावर पीएचडी करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन केलेलं बरं असतं.!! हे आपले विचार असल्यामुळे आपण समाजामध्ये काम करत आहात. खूप खूप अभिनंदन. .!
प्रा. सुरेखा कटारिया.
ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली- राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष