मातृ पितृ दिन के दीन

*चिंतन*
 दि. 25/2/2025

*मातृ-पितृ -दिन की दीन*

मातृसेवा वृद्धाश्रमात गेली असता मनात विचाराने काहूर घातलं. ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलासाठी हाताचा पाळणा, रक्ताचे पाणी, हाडाची काड केली. त्या आई-वडिलांची अवस्था पाहून आपण कुठे चालली आहोत? हा विचार मनाला सारखा टोचत होता. 
अन् मग विचारांचे शृंखला सुरू झाली.

*खरोखरच जगताना*
*इतरां कडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन *यशस्वी* आणि *आनंदी* बनवू शकत.!* त्यासाठी मुलांना जेवणाचं ताट द्यावं; परंतु बसण्याचा पाठ देऊ नये हे सिद्ध होतं. 
बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आकाशात जरूर उडावं.. पण ज्या घरट्याने आपल्याला उब दिली त्या घरट्याला कधीच  विसरता कामा नये. हा संस्कार आम्हाला आत्तापर्यंत मिळत गेला आणि तो आम्ही जोपासला. 
. लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात, शुगरच्या धाकाने साखर खाण बंद करतात... परंतु   वाईट कर्माच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणे सोडत नाहीत. कारण जसे पेराल तसंच  उगवत असतं .आपण जी कृती करतो ती आपली मुले पाहत असतात. आपल्या कृतीतून आपण मुलांना माणुसकीचे धडे देत आहोत. 
*माझ्या सर्व मातापित्यांनो ,नेहमी आनंदी राहा, फार गंभीर होऊन जगू नका.. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले, कोणा वाचून कोणाची अडले नाही.. सुखाने जगा नेहमी खुश रहा. त्यासाठी आपली पुंजी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याजवळ ठेवा.* 
. चांगला स्वभाव सौंदर्याची कमतरता भरून काढू शकतो. परंतु चांगल्या स्वभावाची कमतरता सौंदर्याने भरून काढता येत नाही. 
. *जीवनात कितीही अडचणी असोत, चिंता केल्याने त्या अजून जास्त होतात... शांत राहिल्याने त्या कमी होतात... संयम राखला तर त्या संपून जातात... आणि  जिनवाणीवर श्रद्धा ठेवलात तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात.*
. थोडेसे प्रेम थोडीशी आपुलकी थोडी काळजी आणि थोडीशी विचारपूस  या वृद्ध लोकांनाच नव्हे तर आपल्याला सुद्धा जीवनात आणखी काय पाहिजे.?
वृद्ध लोक म्हणजे अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या अनुभवाच्या एका  एका शिडीच्या पायऱ्यांचं अनुकरण करून आपण विजयाची शिडी लवकर चढू शकतो. कमी परिश्रमात चढू शकतो हे लक्षात ठेवा. 
*आई-वडिलांना दुःख होईल असे कोणतेच काम करू नका.*
*ते खरं तुमचं दैवत आहे*

*प्रा सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड पुणे33*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!