कवित-ा शाश्वत वैभव म स पा साहित्य परिषदेसाठी
पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रह साठी कविता ...!
कवितेचे नाव- *शाश्वत वैभव*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कीर्तनकार डॉक्टर श्वेता निलेश राठोड उद्योग नगर चिंचवड*
*मोबाईल नंबर- 9922054546*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
टेकडी दुर्गा बर्ड व्हॅली पर्यावरणाची वाढवी शान
निसर्ग किमया जादूकांडी फिरवित घुमविते महान
निसर्गनिर्मित ऑक्सिजन कारखाने आयुष्य करी छान
शरीरस्वास्थ राखण्याचे सदोदित ठेवत आहे भान
हेच खरे पिंपरी चिंचवडचे शाश्वत वैभव सदैव तू जाण
कला क्रीडा साहित्य उद्योगाने जनाच्या मनास सांभाळते
जागरूक राहून अंधश्रद्धेला फाटा देत मिथ्यास गाडते
विज्ञानकेंद्र,सांस्कृतिककेंद्र जगण्यातील सत्यता दाखवते
मानवतेचा घेऊनी वसा सदा अन्यायाला वाचा फोडते
पिंपरी चिंचवड उद्योगाने माणसा माणसास जोडते
स्वातंत्र्य वीर चाफेकरांना वंदन करूनी करू अर्चना
सदा नमन करूनी जपतो आम्ही राष्ट्रीय एकात्म भावना
श्रीमंत पालिकेची अनोखी प्रशासकीय उच्च साधना
मसाप साहित्य परिषदेची ही कृतिशील कल्पनेची घनसाधना
हीच खरी तुमच्या आमच्या विकासाची आराधना
साहित्य,कला, शैक्षणिक रंग रंगविले जीवन
लाखेंच्या अनेक कल्पनेने भारून गेले सारस्वतांचे तनमन
वैभव काव्यात कवीनी तरल शब्दांनी पेरले अक्षय धन
काव्या काव्यातून अल्प हुंकारातूनी मिरवतात शब्दघण
पिंपरी चिंचवड सारस्वतांचे सरीवर सरीने वर्षावते मन.
*