चिंतन याला जीवन ऐसे नाव निर्मला पोखरणा
*चिंतन- याला जीवन ऐसे नाव*
*आदरणीय प्रेमचंदजी-सौ निर्मला पोखरणा आज यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चिंतन*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*आज आमची भगिनी संयम प्रेमी, मितभाषी, शांत निर्मलाताई- प्रेमचंदजी पोखरणा व इतरांकडून कमीत कमी अपेक्षा व सतत तडजोड या दोन गोष्टी संयमाने जबाबदारीने निभावणारे आमचे अहमदपूर निवासी बेनोजी ......आज यांच्या लग्नाचा 36 वा वाढदिवस* आज या समाधानी दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर आठवण येते ती *मोतीलालजी खाटेर आमचे मामाश्री व आमचे पिताश्री गौतमचंद जी रायसोनी यांची 36 वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेला या दोघांच्या पुनर्विवाहाचा विचार खूप महत्त्वाचा असून त्यावेळी असणाऱ्या अनिष्ट प्रथांना फाटा देण्याचं काम या दोघांनी केले आहे. सर्वप्रथम माणूसपणाची कास धरणाऱ्या स्वर्गीय मोतीलालजी व स्वर्गीय गौतमचंदजी यांच्या विचारसरणीला कृतीला नमन वंदन. ..!*
आदरणीय ताई- बेनोजी आज तुमच्या लग्नाचा 36 वा वाढदिवस. हळू हळू वय निघून जातं.. जीवन आठवणीच पुस्तक बनून जातं, कधी कुणाची आठवण खूप सतावते तर कधी आठवणीच्या झुल्यावर झुलत आपल्याला मदत करणाऱ्या आपल्या जीवनाला उभारी देणाऱ्या लोकांची सतत आठवण येत राहते..!! *आज आपली ती स्थिती झाली आहे.सकाळी फोन झाला आणि आपल्याशी बोलताना मन भरून आलं. बेनुजी आमच्या निर्मला ताईंनी संयमाने जगण्याच्या वाटेवरी कधी कठोर तर कधी दुःखाचे उंचवटे अशी अनेक वळणे आली... प्रत्येक वळणागणिक अनेक नवीन अनुभव येत राहिले... कधी सुख दुःख तर कधी काही संकटे ... प्रत्येक प्रसंगातून नवीन धडा आपण अनुभवत असताना आपल्या घरातील सर्वांशी प्रेमाचे संबंध ठेवून जगत राहिला. *विशेष कौतुक वाटते ते निर्मलाताईचे जीवनाची वाट असते कधी सुखकर तर कधी खूप खडतर... पण प्रवासात या कधी खचून जायचे ... ठेच लागली जरी तरी उठून नव्याने पुन्हा चालत राहायचं या संस्काराचं ती जतन करत आली नव्या येणाऱ्या पिढीला सुनांना मुलींना तिच्या कृतीतून तिने एक वेगळा संस्कार संस्कारीत केला आहे... बेनुजी आपल्याही जीवनाच्या वाटेवर चालताना कधी मागे वळून पाहिलं नाही... प्रामाणिकपणे प्रयत्न करून पुढे पुढे जात राहिला. आणि अनुभवाची शिदोरी घेऊन प्रवास सुखकर आनंदी केला..!!
बऱ्याच वेळा मनात खूप काही असतं पण आमची ताई आपण मनात असूनही काही शेअर करू शकत नाही. ताईंनी आणि आपणही कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहुल काम करत राहिला म्हणूनच रत्ना सारखी रत्नाची खान असणारी कन्या आणि अभिलाष खरोखरच संस्कारक्षम पिढी आपण घडवली. आपल्या मातापित्यांची सेवा करून एक आदर्श समाजासमोर ठेवला. आज 36 व्या लग्नाच्या वर्ष गाठी निमित्त तुम्हास खूप खूप शुभेच्छा देत असताना,भाऊसा गौतमचंदजी व मामाजी मोतीलालजी यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे.
निर्मलाताई म्हणजे कोणाचही मन दुखण्यापेक्षा दुःख सहन करत समभावाने जगत आली म्हणूनच आपल्या साथीने तिच्या जीवनाचं नंदनवन झालं.
आज आपल्या 36 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*शुभेच्छुक- जीस आपण सतत भरभरून आशीर्वाद देता अशी आपली छोटी बहीण*
*प्रा.सुरेखाजी प्रकाशजी कटारिया*.
*श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा.*
*ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन राष्ट्रीय महिला महामंत्री*
*स्वानंद महिला संस्था संस्थापक अध्यक्ष पिंपरी चिंचवड पुणे.*
*श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट संचालक*