गोदभराई डॉक्टर सलोनी काजल

*चिंतन-गोदभराई डोहाळ जेवण*
😍🥰🌹🧑‍🌾💃🪷❤️🌈
तपस्वी माताजी पद्माबाई यांना सुरेखाचे नमन वंदन...! 
दोन दिवसापूर्वी आपल्या नात सुनबाई डॉक्टर सलोनी, व माझी कन्या अर्थात माझ्या छोट्या जाऊ बाई नीता कटारीया यांची मुलगी या दोघींचा ही सादचा (गोदभराई)कार्यक्रम नुकताच  आनंदी आध्यात्मिक वातावरणात उत्साहवर्धक पार पडला. 
बाई, साद म्हणजे आप्तेष्टांनी नातेवाईक यांनी बाळाच्या सादला,हाकेला ,आवाजाला,त्याच्या किलकारीला,हुंकाराला दिलेला तो  प्रतिसाद असतो. आशीर्वाद असतो. सर्वजणांचं हार्दिक आभार व्यक्त करते. आपणाला आणि बाळाला बाळाच्या आईला भरभरून आशीर्वाद दिले. 
प्रत्येक आईला वाटतं माझा येणार बाळ संस्कारी व्हावं . म्हणून तिला लागलेले सगळे डोहाळे अध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून पूर्ण करण्याचा प्रयत्न शैला उमाकांतजी रायसोनी,  व माझी देवरानी  नीता रमेशजी कटारिया आपण केले आहे. 
राधाकृष्ण थीम ठेवून येणाऱ्या बाळावर अध्यात्मिकतेचा संस्कार आपण  *कुणालजी राजेंद्रजी लुंकड,  डॉ. प्रसन्न उमाकांत रायसोनी* या दोन्ही कुटुंबीयांनी दिला. डॉ सलोनी,काजल तुमच्यातली मातृशक्ती अधिक जागृत होऊन येणाऱ्या बाळाचा संगोपन करण्यासाठी तुम्ही सज्ज होत आहात. तुम्हास खूप खूप शुभेच्छा...! 
प्रत्येक आईला वाटतं की आज माझं मुल उपाशी राहू नये... म्हणून ती रांधत असते तर प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा उद्या उपाशी राहू नये.. म्हणून तो तसबीत करत असतो. *सध्याच्या एकंदरीत परिस्थितीचा अभ्यास करता जगात फक्त ही दोनच नाती अशी आहेत. ज्यांचा दर्जा ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे.,!!*
. *घड्याळाची टिकटिक टाईम मॅनेजमेंट शिकवते आणि आई-वडिलांची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते.!!*
कव्हर साहब कुणालजी व  भतीजे डॉ. प्रसन्नजी
आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत  आलेले आहे. आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायचं…..!!! कारण बाप होणं आजकाल फार मोठे चॅलेंज आहे आणि ते तुम्ही दोघांनीच नव्हे तर बाप होणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारलेला आहे. 
जगताना घडलेल्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला हवी. कुणालजी कव्हर आज आपल्या माताजी असत्या तर मोठा आनंद झाला असता;परंतु त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर, तुमच्या बाळावर आहेत. 
जे होत ते  आपल्या प्रत्येकाच्या कर्म सिद्धांतानुसार होतं.हा  भगवान महावीरांनी सांगितलेला कर्म सिद्धांत मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार  आपण करत असताना तोच संस्कार आपल्या बाळावरही होतो …!!
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!
Every Dark cloud has a silver lining …!!!
प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते आणि त्यामुळे त्या ढगाची रोशनी वाढते. 
  *रायसोनी परिवारात ,लुंकड परिवारामध्ये येणाऱ्या नवीन आत्म्याचं होणार पधार्पण दोन्ही परिवाराचा अध्यात्मिक बेस अधिक सुदृढ करतील.प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न  करतील कारण आपल्या दोन्ही परिवाराच्या मनातील भाव उत्तम असून *राधे कृष्णाची थींम ठेवून
मनातले सदभाव जागृत केले आहेत*.
कार्यक्रम खूप सुंदर झाला. खूप आनंद झाला.*पदमबाई परतोंड  पाहणार तर लाडके बंधू उमाकांत शैलजा दादा दादी होणार आणि लाडके देवर रमेश नीता नाना नानी होणार  राजेंद्रजी लुंकड दादा होणार*
 गोद भरायच्या कार्यक्रमात अन्न हे पूर्णब्रह्म होतं. 
सु नियोजीत कार्यक्रम केला. 
सर्वांच आदरातिथ्य खूप छान केलं.  कार्यक्रमाचे नियोजन करणारे भुवा पूर्वा - श्रेयांस चोरडिया, मामा आयुष बेदमुथा, माशी डॉ सेजल कटारिया, काकाश्री पियुष लुंकड आपण सर्वांनी दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केलं आपले खूप खूप अभिनंदन..! 
  *तपस्वी बाई,माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही परिवारातील येणाऱ्या नवीन बाळास खूप खूप आशीर्वाद. ..! असाच वंशवेल वाढत राहो व आपल्या हातून माता-पित्यांची समाजाची सेवा घडो.* 

*आपली स्नेहांकित*
*प्रा. सुरेखा प्रकाशजी कटारिया रायसोनी*