नमस्कार 
मैत्रिणींनो,
' *मी , मालिका लेखिका*' हा नवा उपक्रम जानेवारी २०२५ पासून दर शनिवारी आपण घेत आहोत.

 या उपक्रमात  जर सहभागी व्हायला आवडत असेल तर त्यांच्या साठी काही टिप्स..

१) तुमचं संपूर्ण कथानक तयार पाहिजे.
ते कथानक चार (एपिसोड)भागात मांडले पाहिजे.
२) त्यातील घटना, प्रसंग संवादातून मांडता आले पाहिजेत.
३) प्रत्येक भागात पुढे काय ही उत्सुकता वाढली पाहिजे.अशा घटना असाव्यात .
४). प्रेक्षकांना म्हणजे इथे वाचकांना कथानकाशी खिळवून ठेवले पाहिजे.असे संवाद असावेत.
५) प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे उठावदार कशी होईल पहाताना त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव संवादातून दिसला पाहिजे.
६) खूप मोठे, लांबलचक संवाद नसावेत.
७) संवाद कथानकाला धरुन बोलीभाषेत लिहिलेले असावेत.
८) मालिका असल्याने त्यात दृष्य एक, दृष्य दोन,..असे भाग करावे लागतील.
९) तेव्हा स्थळ,काळ आणि वेळ यांची कंसात नोंद करुन नंतर तो प्रसंग किंवा ते दृष्य संवादातून लिहायचे आहे.
१०) प्रत्येक भाग म्हणजे एपिसोड चा शेवट उत्कंठा वाढवणारा असावा.
११) कथानकाला साजेसे शीर्षकगीत लिहावे.ते साधे सोपे कमी शब्दात असावे..
१२) मालिकेला, कथानकाला साजेसे शीर्षक असावे.
चला ,लिहायला सुरुवात करुया.
लिहायचे निश्चित केलेत की
 *मला संपर्क* *जरूर करा.* 
काही असल्यास मी मदत करीन.

आता *फेब्रुवारी महिन्यात* 
 *माधवी तिसगावकर* 
 *मालिका लेखिका* *उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यांची नवीन मालिका*' *एक शुन्य शुन्य '* 
या महिन्यात प्रत्येक शनिवारी उपक्रमात आपल्याला वाचायला मिळणार आहे.त्याचे स्वागत.

मैत्रिणींनो,
तुम्हाला या उपक्रमात सहभागी व्हायला आवडत असेल तर 
तुम्ही माझ्या कडे संपर्क करा.
 व्हॉटसॅप वर मेसेज करा.

डॉ.रजनी अपसिंगेकर 
 *संपर्क*:- *९५४५०७८६३४*

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता