चिंतन- काय करावे कल्पना शिंगवी

आजचे चिंतन
*काय करावं -चिंता की मननं*

दि.5/12/2024

*प्रिय कल्पना  सुरेखा माशीचा जय जिनेन्द्र*
    तुझ्याकडून आले आणि मनात अनेक विचारांनी काहूर माजवलं.
 लक्षात ठेव कांही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं हे गरजेचं असतं... आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी...! 
. *कालच्या एकंदरीत संदीपच्या, रोहनच्या संवादावरून जो इंसान झूठ बोलने की कला जानता है.. वह गैरों को तो खुश रख सकता है लेकिन  खुद को को नही.!!* तिकडच्या पार्टीतून हे जाणवलं.

        *शिक्षण कुठूनही मिळवता येत; पण संस्कार घरातूनच मिळतात तेच संस्कार तुझ्यावर झाल्यामुळे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तू ठामपणे उभी आहे ..! तुला सलाम...! ! लुनावत परिवाराने दिलेली संस्काराची देणच आहे* . 
    *कितीही चांगल्या शब्दाचा सुविचार असु दे, चेहऱ्यावर हसू, नजरेत आपुलकी, आणि ह्यदयात प्रेम  तुझ्या मध्ये दिसलं.ते होतं, ते आहे. रोहन संयम ठेव संकटाचे हे ही दिवस जाती*
*कल्पना...विलासजी राठोड, संदीप, प्रशांत हे सारे बंधू व आम्ही तुझ्या पाठीशी आहोत*.
* म्हणतात ना, चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.*
*     *जीवनात अशी माणसं भेटावी जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर..* *पडलेल्याला उचलून चालायला लावणारी असावी*.
*  हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे... खरंतर फक्त  नाते प्रेमाचे असावे अशी कांहीच गरज नसते..* *तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे हे फार गरजेचे असते. ते आपल्या मध्ये आहे* 
* नेहमी सुप्रभातीत दोन गोष्टी कराव्यात असं मला वाटतं.कालचे दुःखाचे, वाईट प्रसंग  विसरून जीवन जगायला यायला हवं. या सगळ्या घटनांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. काल तुझ्या डोळ्यातील पाणी तुटत नव्हते. घरी आल्यानंतर माझे मन अस्थिर झाले.स्वतःला सांभाळ रोहन कडे लक्ष दे.सर्व काही  व्यवस्थित होईल.
आपण प्रयत्न करू.वेळच या समस्यांवर उत्तर शोधेल.
आज काहीतरी नवीन करण्याची उर्मी आपल्यामध्ये असावी.हे जीवन सुंदर आहे.आणि ते तू करत आहेस. तू स्वतःची काळजी ... ! 

*तुझीच मासी सुरेखा,मासाजी प्रकाश*🙏

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण