घुंगटातून बाहेर भाग चार पहिली रात्र

4 गुंठातून बाहेर आत्मचरित्रासाठी

*लग्नानंतरची पहिली रात्र*
तो दिवस ती रात्र आठवली  तरी सारे अंग शहारते. 
घर नातेवाईकांनी पाहुण्यांनी गच्च भरलेलं होतं आमच्या लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय ठरली त्याचा असं झालं रात्री 10 नंतर सर्वांची जेवण आटपली. सर्वत्र झोपण्याची तयारी सुरू होती आमच्या ननंद बाईंनी मला कपडे बदलण्यास सांगितले दिवसभर फुबरीची घातलेली गुजराती साडी काढून मी दुसरी साडी घातली माझा आवरू लागले. मी काढून ठेवलेले कपडे यांचे मामेभाऊ, मित्रत्वाचे बंध जपणारे अनिलजी ओस्तवाल यांनी परिधान केले व ज्या खोलीमध्ये आमचे सोय केली होती. मी खाली असतानाच वरच्या मजल्यावर ते घुंगट घेऊन जाऊन बसले. सर्वत्र गोंधळ चालला होता; पण हा चाललेला गोंधळ अगदीच सावकाश कुचु कुचु बोलत चालला होता. हे माझ्या लक्षातच आले नाही. मी ही स्वतःच आवरण्यात दंग होते. 
घरातल्या नंदांनी प्रकाशजींना रूम मध्ये जाण्यासाठी सांगितले तेही गेले घुंगट घेऊन पलंगावर बसलेली माझी  छबी मामी भावा त्यांनी पाहिली व दुधाचा ग्लास त्यांना देऊ केला त्यांनाही भूक लागली होती त्यांनी ग्लासभर दूध पिऊन घेतले. मग घुंगट घेऊन बसलेल्या माझ्या छबितील अनिल च्या जवळ जवळ जाऊन बसू लागले जसे ते जवळ येऊन बसू लागले तसे तसे अनिल भाऊ दूर जाऊ लागले त्यांच्या हेही लक्षात आले नाही त्यानंतर रिती नुसार   घरातल्या सर्व थोर मोठ्यां महिलांनी राते जोगाईची गाणी म्हटली . देवाला दिवा लावण्यास सांगितला राव नारळ फोडण्यासाठी त्यांना खोलीच्या बाहेरून निरोप आला. व नारळ फोडण्याचा आवाज झाला हा आवाज ऐकताच दबाव धरून बसलेल्या सर्व मित्र परिवार नंदा यांचा एकच हास्याचा स्पोट झाला. एकदमच रात्री अकरा वाजता काय झाले. मला अजून ननंद बाई घेण्यास का येत नाहीत या विचारात असतानाच या हास्याच्या कल्लोळन  मीही गोंधळून गेले. काय घडतंय हे कळण्याच्या अगोदरच मी गडबडून गेले. हा सारा घडला प्रकार घरातली मंडळी एकमेकांना सांगत होती तेव्हा हे मला कळाले. सगळे म्हणत होते प्रकाश फसला भाभी समजूनच त्याने अनिलचा घुंगट उघडण्याचा प्रयत्न केला व देवाला नारळ फोडून जीवनाच्या नाटकातील दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली. या साऱ्या गमती जमती होत होत्या परंतु जवळजवळ दीड वर्ष आमची एंगेजमेंट राहिली.  त्या दीड वर्षात रांजणगावच्या अनेक गोष्टी यांनी मला पत्राद्वारे शेअर केल्या होत्या.  आर्थिक परिस्थिती घरातील जुन्या विचारांचे लोक एकत्र कुटुंब पद्धती या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह अगोदरच झाला होता.  एंगेजमेंट नंतर दीड वर्षांनी लग्न झाले. 
 आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण घेणं हाच एक यावर रामबाण उपाय होता.याचा विचार करून लग्नाच्या पहिल्याच रात्री  प्रकाशजीना दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी साकडे घातले. त्या गोष्टीला त्यांनी होकार दिला आणि जीवनाच्या नाटकातील दुसऱ्या अंकाला   सुरुवात होण्यापूर्वी शिक्षणाची आवड असणाऱ्या मला जणू शिक्षणाची दारे त्यांनी उघडी केली.
  प्रकाश पुण्याला आणि मी रांजणगावला आम्हाला फारसा एकमेकाला वेळ देता येत नसे.घरातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना आणि शिकण्यासाठी अभ्यास करताना माझी मात्र  पत्रेधातिरपीटी  उडायची. 

       मला असं वाटतं वयाच्या एका टप्प्यावर माणसाला  वेगवेगळ्या अनुभवाची अनुभूती येते. हीच अनुभूती मला आमच्या घरातील सासुबाई सज्जनबाई, काकी सासूबाई विमलबाई, आमच्या मोठ्या सासुबाई राजकुवरबाई व आमची मोठी जेठांनी पानकुवर बाई व तसेच  नंदा ,भुवासासवा यांच्या वागण्यातील पुरोगामी विचार माझ्या शिक्षणाला अडसर करत होते परंतु तो अडसर म्हणजे माझ्या जीवन रस्त्यातील स्पीड  ब्रेकर समजून मी अभ्यास करत होते.ज्याप्रमाणे स्पीड ब्रेकर वरून जाणारी गाडी  प्रथम हळूच परंतु स्पीड ब्रेकर ओलांडल्यानंतर तिला येणारा वेग जसा वाढतो. त्याप्रमाणे माझ्या अभ्यासातील, कृतीतील वेग वाढत होता. नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता येत होती. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत होता. घडुन गेलेल्या घटनांचे प्रसंगाचे अवलोकन  करू लागले.
आर्थिक सुबत्ता नाही जनमानसांची वर्दळ व प्रचंड राबता आणि त्यात मी सर्वात मोठी सून सर्वांना माझ्याकडून अपेक्षा. ..! सर्वांची अपेक्षा पूर्ती करत असताना माझ्या मनाची, तनाची मात्र ससेहोलपट होत होती. 
जीवनात घडणारे अनेक प्रसंग...!याचा अवलोकन करताना मनात विचार येई... हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता  माझी वाढत होती. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता हळूहळू तटस्थ होत होता.    त्यामुळे प्रत्येक प्रसंगांना तोंड देण्याचे सामर्थ्य वाढले. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लाउन घ्यायची ह्याचे जणू काही  प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे ? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.  

लग्नानंतर सतत दोन वर्ष पाणवणारे डोळे आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत होऊ लागली. आपले कोण परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होत ती माणसे दुरावणार तर नाही ना. आपल्याला  हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागलं. 
(मग अपेक्षांचं ओझ हळूहळू कमी होत जात आणि एक अंतर आपोआपच तयार होते. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे तटस्थता येते. ) 

आपल्या आजुबाजुचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं.  हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागत. खरं म्हणजे ते सुंदर होतच पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते कारण आता कसलेही ओझ नसत. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे हौऊ शकत नाही पण दूर राहून ती करू शकतो हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण  केले जाते. 

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहित झालेलं असत कि कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते.

हे ज्याला कळलं / उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.) 


गुंठातून बाहेर आत्मकथनासाठी

4)

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!